50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फिचर्स ! Redmi 12 स्मार्टफोन लाँच, किंमत 10 हजार पेक्षा कमी

 ग्राहक अनेक दिवसांपासून Redmi 12 च्या स्वस्त आणि मस्त सिरीजच्या प्रतिक्षेत होते. या बजेट फोनमध्ये भन्नाट फिचर्स आहेत. 

Aug 01, 2023, 16:46 PM IST

Redmi Series  12  Launched:  स्मार्टफोन ब्रँड Xiaomi ने पुन्हा एकदा इंडियन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. Xiaomi च्या  Redmi 12 सिरीज लाँच झाली आहे. Redmi 12 5G आणि Redmi 12 4G हे स्मार्टफोन कंपनीने लाँच केले आहे. 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असे जबरदस्त फिचर्स असलेले हे स्वस्त स्मार्टफोन आहेत. याची स्टार्टींग किंमत 10 हजार पेक्षा कमी आहे. या फोनची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. 

1/9

Redmi 12 5G आणि Redmi 12 4G हे स्मार्टफोन कंपनीने लाँच केले आहेत. हे बजेट फोन असून याची  स्टार्टींग किंमत 10 हजार पेक्षा कमी आहे.

2/9

Redmi 12 4G या व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज आहे. याची स्टार्टींग प्राईज 8,999 रुपये आहे. तर 6 GB, 128 GB व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे.

3/9

Redmi 12 5G  च्या 6 GB RAM, 128 GB स्टोरेजची किंमत 12,499 रुपये आणि 8 GB RAM, 256 GB वेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे.

4/9

Redmi 12 5G च्या 4GB RAM, 128 GB स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 1000 रुपयांच्या बँक ऑफरसह 10,999 रुपये इतकी आहे.

5/9

Redmi 12 5G हा 6GB RAM, 128GB स्टोरेज तसेच 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

6/9

Redmi 12 5G फोनमध्ये MediaTek Helio G88 12nm प्रोसेसरस आहे. Android 13 OS  वर MIUI 14 सपोर्ट मिळणार आहे. 

7/9

Redmi 12 5G फोनमध्ये 6.79-इंच FHD + डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट आणि 1080 X 2400 पिक्सेल रिझोल्यूशन मिळते.

8/9

Redmi 12 5G फोनमध्ये क्रिस्टल ग्लास डिझाइन आहे. तसेच 5,000mAh तगडा बॅटरी बॅकअप आहे. 

9/9

Redmi 12 5G फोनमध्ये  50MP चा मेन कॅमेरा,  8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि  2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे.