गोळ्या लागल्या तरी सोडलं नाही, 3 दहशवाद्यांना कंठस्थान घालणाऱ्या 'बिंदास भाई'ला शौर्यचक्र

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 412 शूरवीरांना सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसातील हवालदार मुदासीर अहमद शेख यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

Jan 26, 2023, 15:42 PM IST
1/6

Martyr Ct Mudasir Ahmad Sheikh

दहशतवाद्यांशी लढताना शौर्य दाखवल्याबद्दल मुदासीर अहमद शेख (३२ वर्षे) यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. मुदासीर अहमद शेख हे 25 मे 2022 रोजी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. या कारवाईत त्यांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते. मात्र हे करताना मुदासिर यांना वीरमरण आले.

2/6

martyr mudasir sheikh Kashmir Police

25 मे 2022 रोजी जम्मू काश्मिरमध्ये तीन दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाली होती. अमरनाथ यात्रा हे दहशतवाद्यांचे लक्ष्य होते.  यावेळी सुरक्षा दलांनी बारामुल्लामध्ये तपास सुरू केला. त्याचवेळी मुदासीर अहमद शेख यांनी दहशतवाद्यांचे वाहन येत असल्याचे पाहिले. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. 

3/6

martyr mudasir sheikh kashmir

यावेळी मुदासीर अहमद शेख यांनी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांच्या वाहनावर झेप घेतली आणि एका दहशतवाद्याला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर बाकीच्या दहशतवाद्यांनी मुदासीर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

4/6

martyr mudasir ahmad

या हल्ल्यात मुदासीर अहमद शेख हे गंभीर जखमी झाले. असे असतानाही त्यांनी एका हाताने दहशतवाद्याला धरून ठेवले आणि दहशतवाद्यांवर गोळीबार सुरुच ठेवला. या हल्ल्यात मुदासीर शेख गंभीर जखमी झाल्याने शहीद झाले. मात्र मुदासीर यांनी तीन दहशतवाद्यांच्या खात्मा केला.  

5/6

mudasir ahmad father

मुदासीर यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे वडील मकसूद अहमद यांनी, माझ्या मुलाच्या बलिदानामुळे हजारो जीव वाचले. आता तो कधीच परत येणार नाही हे आम्हाला माहीत आहे. पण आम्हाला अभिमान आहे की मुलाने लढताना जीव दिला.

6/6

Bindass Bhaijaan

मुदासीर अहमद शेख हे बिंदास म्हणून ओळखले जायचे. बारामुल्लामध्ये त्यांच्या नावावर बिंदास चौक बांधण्यात आला आहे. शहीद जम्मू-काश्मीर पोलीस हवालदार मुदासीर अहमद शेख यांच्या स्मरणार्थ असे या चौकाला नाव देण्यात आले आहे.