Asia Cup 2023 : ...तर 'या' तारखेला खेळवला जाणार भारत-पाक सामना, ACC चा मोठा निर्णय

Asia Cup 2023, India vs Pakistan:  येत्या रविवारी श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यामध्ये हा सामना रंगणार असून सर्व चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता आहे.

Sep 08, 2023, 14:05 PM IST
1/6

एशिया कप 2023 मध्ये सुपर-4 सामन्यात रविवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामन्यात सामना रंगणार आहे. 

2/6

दरम्यान सामन्यात पावसाची शक्यता लक्षात घेऊन एशियन क्रिकेट काऊंसिलने मोठा निर्णय घेतला आहे. 

3/6

पावसाची शक्यता पाहता सामन्यात राखीव दिवस म्हणजेच रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. 

4/6

आता भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस असेल. 11 सप्टेंबर हा दिवस रिझर्व्ह डे म्हणून ठेवण्यात आलाय. 

5/6

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 10 सप्टेंबरला पावसामुळे खेळला गेला नाही तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबरला खेळवला जाईल.

6/6

10 सप्टेंबर रोजीच सामना पूर्ण करण्याचा एसीसीचा पहिला प्रयत्न असेल. त्यासाठी ओव्हर्स कट देखील कऱण्यात येतील. असं असूनही सामना पूर्ण न झाल्यास, राखीव दिवशी सामना सुरू होईल.