Mahabharata Story: महाभारताच्या या 4 महिलांच्या प्रतिशोधाची अजब कहानी! एकीने तर घेतला पुनर्जन्म
तुम्हाला माहित आहे का महाभारत हे केवळ पांडव आणि कौरवांच्या युद्धाची गाथा नाही तर अनेक सूड आणि शापांचीही कथा आहे.महाभारतातील प्रत्येक कशा काही ना काही संदेश देते.
1/5
2/5
महाभारत होण्यामागे अनेत कारणं होती पण आणखी एक कारण म्हणजे द्रौपदीचा झालेला अपमान.या युद्धामध्ये आणखी एक भर म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण करताना भीमाने दुर्योधनच्या मांड्य़ा तोडून अपमानाचा बदला घेईल अशी शपथ घेतली होती.दुशासनाच्या रक्ताने केस धुतल्याशिवाय केस बांधणार नाही अशी शपथ द्रौपदीने घेतली होती. असे म्हटले जाते की द्रौपदीने 13 वर्ष केस बांधले नव्हते.
3/5
दुर्योधनची पत्नी भानुमती ही एक महान सौंदर्यवती होती.ती कंबोज राजा चंद्रवर्मा यांची कन्या होती.तिच्या लग्नासाठी राजाने स्वयंवर आयोजित केले होते त्यावेळी दुर्योधनने तिला स्वयंवरातून पळवून नेले होते आणि तिच्याशी लग्न केले.असे केल्यामुशळे भानुमती कधीच खुश नव्हती. त्यामळे तिने दुर्योधनला शाप दिला की त्यांला जिवंचत असतानाच नाही तर मृत्यूनंतरही बदनामीला सामोरे जावे लागेल. यामुळे आजही दुर्योधनचा निषेध केला जातो.
4/5
महाभारतामधील अविस्मरणीय गोष्ट म्हणजे अंबाचा बदला. अंबा, अंबिका आणि अंबालिका या काशीच्या राज्याच्या कन्या होत्या, ज्यांच्या स्वयंवरात भीष्माने तिन्ही बहिणींना पळवून नेले जेणेकरून त्याचा सावत्र भाऊ विचित्रवीर्यशी विवाह व्हावा.अंबिका आणि अंबालिकाने विचित्रवीर्यशी लग्न स्विकारले पण अंबाला भीष्मासोबत लग्न करायचे होते.यावर भीष्म म्हणाला की तो जन्मभर ब्रम्हचारी राहण्याच्या वचनाने बांधलेला आहे त्यामुळे तो विवाह करू शकत नाही. संतप्त, अस्वस्थ आणि दु:खी अंबाने भगवान शिवाकडून तपश्चर्या करून भीष्माचा वध करण्याचे वरदान मिळाले आणि शिखंडी बनून भीष्माचा वध केला.
5/5