बाबर आझमनंतर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तानचा सुपरस्टार, रिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी

Ricky Ponting On Pakistan Cricket : सर्वांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रतिक्षा आहे. अशातच आता त्यापूर्वी रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केलीये.

| Jun 05, 2024, 22:28 PM IST

Ricky Ponting Prediction on Saim Ayub : ऑस्ट्रेलियन माजी वर्ल्ड कप विनर कर्णधार रिकी पाँटिंगने पाकिस्तानी खेळाडूबद्दल भविष्यवाणी केली आहे, जो भविष्यात पाकिस्तानी क्रिकेटचा नवा सुपरस्टार होऊ शकतो.

1/7

बाबर अँड कंपनी

पाकिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता बाबर अँड कंपनी सुपर-8 मध्ये देखील पोहोचेल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

2/7

भलताच विश्वास

मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मात्र आपल्या खेळाडूंवर भलताच विश्वास आहे. पाकिस्तानला गेल्या 4 महिन्यात सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय.

3/7

रिकी पाँटिंग

अशातच आता माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी पाँटिंग याने पाकिस्तानच्या आगामी सुपरस्टार खेळाडूवर भविष्यवाणी केलीये. 

4/7

सॅम अयुब

पाकिस्तानचा सॅम अयुब हा एक फलंदाज आहे जो यावेळी आपल्या खेळाने जागतिक क्रिकेटला चकित करू शकतो, असं पाँटिंगने म्हटलंय.

5/7

पाकिस्तानसाठी एक स्टार

मी काही पीएसएल सामने पाहिले आणि मला वाटतं की सॅम अयुब एक महान खेळाडू आहे, तो भविष्यात पाकिस्तानसाठी एक स्टार असेल, असं पाँटिंगने म्हटलं आहे.

6/7

मोहम्मद रिझवान

यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये शाहीन आफ्रिदी, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यावेळी पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी करतील, असा विश्वास देखील रिकीला आहे.

7/7

9 जून

दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये युएसएविरुद्ध पाकिस्तान सलामीचा सामना खेळणार आहे. तर 9 जून रोजी भारतासोबत पाकिस्तानला दोन हात करावे लागतील.