एक-दोन नाही तब्बल 130 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अपघातात 6 जणांचा मृत्यू

Feb 12, 2021, 15:57 PM IST
1/8

2/8

  एक दोन नाही तर तब्बल 130 गाड्या एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला आहे. या गाड्या एकमेकांवर धडकल्या तर काही गाड्या ट्रेनखाली चिरडल्या गेल्या.    

3/8

टेक्सासमधील फोर्ट वर्थच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टेक्सासच्या फोर्ट वर्थमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर दोन किलोमीटरपेक्षा जास्त भागावर परिणाम झाला आहे. 

4/8

या भीषण अपघातानंतर डझनभर लोक रात्रभर अडकून पडले होते. सकाळी बचावकार्यानंतर पुन्हा धीम्या गतीनं वाहतूक सुरू करण्यात आली.      

5/8

गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकर्त्यांना खूप संघर्ष करावा लागला. फोर्ट वर्थ फायर चीफ जिम डेव्हिस म्हणाले, 'असे बरेच लोक होते जे त्यांच्या वाहनांमध्ये अडकले आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी हायड्रॉलिक बचाव उपकरणे वापरावी लागली.'

6/8

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार टेक्सासमध्ये अनेक ठिकाणी अशा घटना होत असतात. 

7/8

या दुर्घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र ट्रकचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कार आपापसात भिडल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

8/8

65 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू

65 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात जखमी झालेल्या 65 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.