Rohit Sharma: IPL सुरु होण्यापूर्वीच रोहितने मोडला मोठा नियम; हिटमॅनवर होणार कारवाई?

Rohit Sharma : येत्या 22 तारखेपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यावेळी सर्वांचं लक्ष मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माकडे असणार आहे.

| Mar 13, 2024, 19:56 PM IST
1/7

इंग्लंडचा टेस्ट सिरीजमध्ये पराभव झाल्यावर रोहित रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी पोहोचला होता. 

2/7

यावेळी रोहित मंगळवारी मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होता. 

3/7

या वेळी रोहितच्या हातात असलेला मोबाइल पाहून अनेकांना धक्का बसला. 

4/7

मुळात टीममध्ये नसतानाही रोहित मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये फोन घेऊन कसा गेला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

5/7

याचं कारण म्हणजे सामना सुरु असताना कोणत्याही टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये कधीही मोबाईल वापरण्याला परवानगी दिली जात नाही. 

6/7

मॅच फिक्सिंग आणि इतर वाईट गोष्टींमुळे टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये सामना सुरु असताना मोबाईल वापरावर बंदी आहे. 

7/7

अशातच आता रोहितने सामना सुरु असताना मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये मोबाईल वापरत, नियम मोडला आहे. त्यामुळे त्याच्यावर आता कोणती कारवाई होणार का असा सवाल केला जातोय.