टायगर श्रॉफच्या बहिणीचे बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल
कृष्णा श्रॉफ कलाविश्वात सक्रीय नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या बाकी अभिनेत्रींप्रमाणेच आहे.
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफची बहिणी जगमगत्या दुनियेपासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. कृष्णा नेहमी तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सध्या ती बॉयफ्रेंड एबन हायम्ससोबत एक्वेरियम मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यादरम्यानचे काही फोटो कृष्णाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांचे हे रोमँटिक फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.