Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....

Jul 11, 2019, 14:03 PM IST
1/6

Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....

जगभरातील, विशेष म्हणजे भारतात बाईकस्वारांच्या पसंतीस उतरणाऱ्या बाईकच्या यादीत 'रॉयल एनफिल्ड' Royal Enfield  कायम अग्रस्थानी येते. अर्थात याला काही अपवाद असतीलही. पण, 'एनफिल्ड तो एनफिल्ड है', असं म्हणत त्यावरचं नितांत प्रेम व्यक्त करणारेही काही कमी नाहीत. सध्याच्या घडीला Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, हिमाचल प्रदेश येथे या बाईकचं आणखी एक सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात येत आहे. 

2/6

Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....

अनेक बाईकस्वारांचं प्राधान्य असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील लाहौल- स्पितीच्या खोऱ्यात अर्थात स्पिती व्हॅलीमध्ये एकूण दोन नवे सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात येत आहेत. हिमाचल प्रदेशात येणाऱ्या, तिबेटच्या सीमेलगत असणाऱ्या स्पिती व्हॅलीतील 'काझा' आणि 'किलाँग' या ठिकाणी हे सर्व्हिस सेंटर असतील. 

3/6

Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....

स्पिती व्हॅली येथे असणारा बाईकस्वारांचा ओघ पाहता या काझामध्ये असणारं सर्व्हिस सेंटर हे अनेक दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे. स्पितीच्या खोऱ्यात आल्यानंतर इतर लहानमोठ्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांशी काझापर्यंत सहज पोहोचता येतं. त्यामुळे सध्या एनफिल्ड चालवणाऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. 

4/6

Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....

हिमाचल प्रदेशातील हे दोन नवे सर्व्हिस सेंटर पाहता आता या ठिकाणी एकूण १३ सर्व्हिस सेंटर सुरु झाले आहेत. तर, देशात रॉयल एनफिल्ड़चे एकूण ९४३ सर्व्हिस सेंटर आहेत. भारतात रुजणारं बाईकस्वारीचं वेड पाहता एनफिल्डकडून आतापर्यंत लडाख, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि इतरही दुर्गम भागांमध्ये सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात आले आहेत. 

5/6

Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....

स्पिती व्हॅलीमध्ये सुरु झालेल्या या सर्व्हिस सेंटरविषयी माहिती देत रॉयल एनफिल्डमधील अधिकाऱ्यांनी हिमालयातील या डोंगरवाटा एनफिल्डसाठी एखाद्या श्रद्धास्थळाप्रमाणे असल्याची प्रतिक्रिया दिली. 

6/6

Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....

गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही रॉयल एनफिल्डवर येणाऱ्या बाईकस्वारांच्या आकड्यात लक्षणीय वाढ पाहिली आहे. काझा आणि किलाँगमध्ये सर्व्हिस सेंटवर सुरु करुन आम्ही समुद्रसपाटीपासून दूर आणि हवामान बदलातही चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन त्यांनी दिलं. काझा आणि किलाँग येथे असणाऱ्या सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा असून, प्रशिक्षित कर्मचारी तेथे सेवेत असतील. त्यामुळे विचार कसला करताय? उचला घ्या ते हेल्मेट आणि चला स्पितीच्या निर्धास्त सफरीला.....