close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'पती पत्नी और वो' चित्रपटावर भूमिची अजब प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडणेकर सध्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Jul 10, 2019, 16:33 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडणेकर सध्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. विनोदी कथे भोवती चित्रपट फिरत असताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल भूमि म्हणाली की, 'पती पत्नी और वो ' चित्रपटाची कथा फार विनोदी आहे. चित्रपटाची कथेच्या माध्यमातून वास्तवता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजच्या दर्शकांना अवडेल अशी चित्रपटाची कथा आहे.' भूमि सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिच्या दिलखेच अदा चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असतात. भूमिचे काही निवडक फोटो...  

1/6

'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर, अनन्या पांडे हे त्रिकूट चाहत्यांना एकत्र दिसणार आहे. 

2/6

१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. 

3/6

या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. 

4/6

विवाहबाह्य संबंधांवर आधारीत 'पती पत्नी और वो' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. 

5/6

चित्रपटात भूमि मोठ्या शहरातील एका मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे.

6/6

चित्रपटासाठी सर्वात आधी अभिनेत्री तापसी पन्नूच्या नावाची चर्चा रंगली होती. त्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री भूमि पेडणेकरची वर्णी लागली.