250 कोटींची कार! जाणून घ्या Rolls Royce 'या' कारमध्ये नेमकं असं आहे तरी काय?

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car: तुम्ही आतापर्यंत काही लाखांच्या किंवा अगदी काही कोटींच्या कारबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल. तुम्ही स्वत:ही अनेकदा लाखो रुपयांच्या कार्स चालवल्या असतील. पण आलिशान कार बनवणाऱ्या रोल्स रॉयल्स कंपनीने नुकतीच लॉन्च केलेली कार ही किंमतीसंदर्भात जगातील सर्वात महागडी कार आहे. जाणून घ्या या कारच्या फिचर्सबद्दल...

Aug 23, 2023, 18:17 PM IST
1/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

रोल्स रॉयल्स कंपनीने नुकतीच जगातील सर्वात महागडी कार नुकतीच लॉन्च केली आहे. 

2/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

Rolls Royce ने लॉन्च केलेल्या या कारचं नाव 'ला-रोज-नोईरी' ड्रॉप टेल (La Rose Noire) असं आहे. गाडीचं दुसरं नाव असं आहे.

3/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

'ला-रोज-नोईरी' ड्रॉप टेलची किंमत 30 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 250 कोटी रुपयांची आहे.  

4/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

'ला-रोज-नोईरी' ड्रॉप टेल कारचे चारच मॉडेल तयार केले जाणार असल्याने ही जगातील सर्वात दुर्मिळ कार असणार यात शंका नाही. 

5/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

'ला-रोज-नोईरी' ड्रॉप टेल ही कार रोल्स रॉयसने 1930 सालातील एका वेगवान यॉटपासून प्रेरित होऊन डिझाइन केली आहे.

6/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

रोल्स रॉयल्सने ही कार तयार करण्यासाठी एकूण 1600 लाकडाचे तुकडे वापरले आहेत. कार डिझाइन करण्यासाठी 2 वर्ष लागले. 

7/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

'ला-रोज-नोईरी' गाडी तयार करण्यासाठी फार खास गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच ही कार एवढी महाग आहे.

8/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

'ला-रोज-नोईरी'ला रिमुव्हेबल रुफ असणार आहे. हे रुफ कार्बनफायबरपासून तयार केलेलं आहे. एका क्लिकवर हे रुफ सेट करता येईल किंवा रिमूव्ह करता येईल.

9/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

या कारमध्ये ट्वी-टर्बोचार्ज्ड 6.75 लिटर व्ही 12 इंजिन कारमध्ये आहे.

10/10

Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car

कारमधील इंजिनची क्षमता 601hp इतकी असून यामधून 840 एनएम टॉर्क तयार होतो.