...म्हणून सैफ अली खान मुलांना देऊ शकत नाही 5000 कोटींची संपत्ती!

आता तुम्ही विचार करत असाल की असं का आणि पतौडी कुटुंबाकडे एवढी संपत्ती असताना ते आपल्या मुलांना का देऊ शकत नाहीत.

Aug 20, 2023, 17:44 PM IST
1/8

पतौडी घराण्याचा वंशज आहे सैफ अली खान

Saif Ali Khan is a descendant of Pataudi family

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा राजघराण्यातील आहे. सैफ हा पतौडी घराण्याचा दहावा नवाब आहे. सैफच्या वडिलांचे नाव मन्सूर अली खान पतौडी आहे. पतौडी घराण्याचा वंशज असल्याने सैफकडेही अमाप संपत्ती आहे.

2/8

हजारो कोटींची संपत्ती

Saif wealth is worth thousands of crores

माध्यमांच्या वृत्तानुसार सैफ अली खानकडे जवळपास पाच हजार कोटींची संपत्ती आहे. ज्यामध्ये हरियातील पतौडी पॅलेससह भोपालमध्येही त्याची संपत्ती आहे.

3/8

मुलांना देऊ शकत नाही संपत्ती

saif Cannot give wealth to children

मात्र सैफ ही सगळी संपत्ती त्याच्या मुलांना देऊ शकत नाही हे सत्य आहे. सैफला पहिल्या पत्नीकडून सारा, इब्राहिम आणि करिनाकडून तैमुर आणि जेह अशी चार मुले आहेत.  

4/8

कायद्याच्या कचाट्यात अडकली संपत्ती

Saif wealth caught in the thick of law

सैफचे आलिशान घर पतौडी पॅलेस 1968 च्या एनिमी डिस्पयुट अॅक्ट अंतर्गत येते आणि अशा संपत्तीवर कोणीही आपला हक्क सांगू शकत नाही

5/8

काय आहे कायदा?

Sai ali khan family

या कायद्यानुसार, फाळणीनंतर किंवा 1965 आणि 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या आणि तेथील नागरिकत्व घेतलेल्यांची सर्व स्थावर मालमत्ता एनिमी डिस्पयुट अॅक्ट अंतर्गतची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली.

6/8

मालमत्तेबाबत निर्णय होणे फार कठीण

very difficult to decide about Saif property

माध्यमांच्या वृत्तानुसार,  कोणतीही व्यक्ती या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपतींकडे जाऊ शकते. पण असे असतानाही यावर कोणतीही कारवाई करणे फार कठीण आहे.

7/8

प्रॉपर्टी मिळवणं कठीण

Difficult to get property

सैफ अली खानचे पणजोबा हमीदुल्ला खान हे ब्रिटीश राजवटीत नवाब होते आणि ते आपल्या सर्व संपत्तीचे मृत्युपत्र करू शकले नव्हते. यामुळे सैफला या प्रॉपर्टीसाठी लढणे खूप कठीण जाऊ शकते.

8/8

पतौडी कुटुंबिय मागू शकतात दाद

Pataudi family can seek justice

यामुळेच सैफने ही मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला तर पतौडी कुटुंब, विशेषत: पाकिस्तानातील सैफच्या पणजोबांचे वंशज या प्रकरणी दाद मागू शकतात. (सर्व फोटो - @saraalikhan95/instagram)