डॉ. मिंधे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून फिरणार का? संजय राऊत यांची खोचक टीका

Sanjay Raut : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांवरुन राज्यातील सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याबाबत आता भाजपकडून विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे.

Apr 02, 2023, 14:17 PM IST
1/6

sanjay raut savarkar

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समोर आणण्यासाठी काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेत भाजपसोबत शिंदे गटही सामील झाला आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोचऱ्या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

2/6

sanjay raut criticize shinde group

सावरकरांनी शेडी-जाणव्याचं हिंदुत्व स्वीकारलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेलं आवडत नव्हतं. मग शिंदे दाढी काढणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही.   

3/6

sanjay raut cm eknath shinde

त्यामुळे आता डॉ. मिंधे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का? एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे. तुम्ही सावरकरांची विचारयात्रा काढताय. तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलंय का?

4/6

sanjay raut savarkar book

मिंधे गटानं आधी सावरकर साहित्याचं पारायण करावं आणि त्यांचे सगळं साहित्य वाचावं. माझी जन्मठेप, सहा सोनेरी पानं, इतर विज्ञानवादी लिखाण या सगळ्या लिखाणाचं डॉ. मिंधे आणि त्यांच्या 40 लोकांनी पारायण करावं

5/6

sanjay raut attack on bjp

त्यानंतरच मग त्यांच्या विचारांसाठी सावरकर सन्मान यात्रा काढावी. भाजपलाही सावरकर यांच्या विचारांचं पारायण करायची गरज आहे. तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

6/6

sanjay raut on bjp

सावरकरांनी या देशाला एक दिशा दिली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. भाजप, मिंधे गट तो दृष्टीकोन पाळणार असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे.