मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर Sara Ali Khan चं सडेतोड उत्तर म्हणाली...

Sara Ali Khan on Trolling : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सारा अली खान ही सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे अनेक मजेशीर व्हिडीओ तर नेहमीच चर्चेत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सारा अली खानला सोशल मीडियावर मंदिरात हजेरी लावली म्हणून ट्रोल करण्यात येत होतं. आता त्यावर सारा अली खाननं सडेतोड उत्तर दिले आहे. 

Mar 22, 2023, 19:02 PM IST
1/5

Sara Ali Khan on Trolling

सारा अली खान ही महादेवाची भक्त असून ती नेहमीच केदारनाथ किंवा मग कोणत्याही महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचे आपण पाहतो. ती सोशल मीडियावर ती कुठे जाते त्याचे फोटो देखील शेअर करत असते.   

2/5

Sara Ali Khan on Trolling

दरम्यान, आता सारानं नुकतंच हिमाचलच्या बिजली महादेवचे दर्शन घेतले होते. त्यानंतर देखील सारा अली खान ट्रोल होऊ लागली होती. 

3/5

Sara Ali Khan on Trolling

सततच्या ट्रोलिंगवर मात्र, सारानं आता स्पष्ट वक्तव्य केलं आहे. तिला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही असं तिनं स्पष्टपणे सांगितलं आहे. 

4/5

Sara Ali Khan on Trolling

एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत सारानं हा खुलासा केला आहे. 'माझ्या कामाला घेऊन कोणाला काही प्रश्न किंवा मग कोणी काही सांगत असेल तर मी ऐकूण घेईन कारण त्यांचे मनोरंजन करण्यासाठी मी अभिनय करते. पण माझ्या खासगी आयुष्यावर किंवा माझ्या लाइफस्टाइलवर प्रश्न करत असेल तर त्यानं मला काही फरक पडत नाही', असं सारा अली खाननं तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

5/5

Sara Ali Khan on Trolling

साराचा नुकताच 'गॅसलाइट' हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरण शर्मानं केलं आहे. सारा अली खानसोबत या चित्रपटात विक्रांत आणि चित्रांगदा सिंह देखील आहेत.