पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

भक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

May 22, 2020, 13:37 PM IST

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईनंतर पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुण्यातील सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय गणपती मंडळाच्या व्हिडिओ कॉन्फसरींग बैठकीमध्ये घेण्यात आला.

1/5

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडल्या जाणार आहेत.   

2/5

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

त्याचप्रमाणे भक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे.  

3/5

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  

4/5

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

शिवाय गणरायाची मुर्ती घडवताना मास्क लावलेली रचना करू नये, असे आवाहन मानाच्या गणपती मंडळांनी  मूर्तीकारांना केले आहे.   

5/5

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

पालिका व पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून तसेच सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोरपणे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत झाला.