लॉकडाऊन । रेल्वे तिकिट बुकिंग काउंटरवर आरक्षण मिळू लागले
रेल्वे तिकिट बुकिंग काउंटर उघडण्याचे रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानंतर तिकीट खिडकीवर लोक येऊ लागले आहेत.
रेल्वे तिकिट बुकिंग काउंटर उघडण्याचे रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानंतर तिकीट खिडकीवर लोक येऊ लागले आहेत.
1/7
2/7
लॉकडाऊनच्या काळात रेल्वे बंद असल्याने अनेकांना अडकून पडावे लागले होते. आता रेल्वे सुरु होणार असल्याने त्यांना आपल्या घरी जाता येणार आहे. रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. दाखवला आहे. त्याबाबतचे संकेत दिले आहेत. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि एजंटला तिकिट बुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे.
3/7
4/7
देशात सामान्य स्थिती करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे काउंटर उघडता येतील अशी स्टेशन ओळखण्यासाठी आम्ही एक प्रोटोकॉल बनवत आहोत. काउंटरवर मोठ्या संख्येने लोक तिकिट बुक करण्यासाठी जमले नाहीत याची खात्री करुन घ्यावी लागेल, म्हणून आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत आणि त्यासाठी एक प्रोटोकॉल बनवत आहोत, असे रेल्वे मंत्री गोयल म्हणालेत.
5/7
रेल्वे तिकिट बुकिंग काउंटर सुरु करण्यात आलेत. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि एजंटला तिकिट बुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या जनरल व्यवस्थापकांना आज शुक्रवारपासून बुकिंग काऊंटर सुरू करण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व जनरल व्यवस्थापकांना गरजेनुसार आरक्षण काउंटर कुठे उघडायचे ते ठरविण्यास सांगितले आहे.
6/7