सद्गुरु श्री वामनराव पै छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतात आदर्श? शिकण्यासारख्या 'या' 10 गोष्टी

Shivaji Maharaj Quotes in Marathi: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी कायमच छत्रपती शिवरायांना जीवनविद्या मिशनचे आदर्श मानले. महाराजांच संपूर्ण जीवनच प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. पण महाराजांच्या 10 गोष्टी ज्या सद्गुरु आचारणात आणण्यास सांगतात. 

| Feb 19, 2024, 10:03 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Skills : सद्गुरु श्री वामनराव पै यांनी जगकल्याणासाठी जीवनविद्या मिशनची निर्मिती केली. जीवनविद्या मिशनने कायमच प्रयत्नवाद शिकवला. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असा संदेश दिला.  सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात की, जीवनविद्या मिशन तीन व्यक्तींना आपलं आदर्श मानते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य आणि आपले भगवान श्रीकृष्ण. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते 10 वेगळेपण आणि गुण सांगितले, जे प्रत्येकाने जीवनात आचरण करायला हवेत, ते जाणून घेऊया. 

1/10

प्रयत्नवाद

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

जीवनविद्येला दैववाद अजिबात मान्य नाहीये. जीवनविद्या ही प्रयत्नवादाला जास्त महत्त्व देते. महाराजांनी कधीच नशीब, दैव सारख्या गोष्टींचा आधार घेतला नाही. या उलट प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्वतःच्या अथक प्रयत्नांनी आणि मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापन केलं.

2/10

स्त्री सन्मान

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

जीवनविद्या केवळ स्त्री शक्ती नव्हे तर स्त्री शक्ती बरोबर स्त्री सन्मान हा संस्कार देते. राजमाता जिजाऊ या स्त्री शक्ती आणि स्त्री सन्मान या दोन्हींचा मूर्तिमंत आदर्श आहेत. आणि महाराजांनी सुद्धा हाच स्त्री सन्मान आपल्या आचरणातून प्रत्येक वेळी दाखवून दिला आहे.

3/10

समता

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

समता हे मानवी संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे मूल्य आहे. समता पहावी तर महाराजांच्या आचरणात. हे राज्य रयतेचे आहे या स्मरणात स्वराज्य प्रस्थापित करताना अठरा पगड जातींच्या लोकांना समानतेच्या अधिष्ठानावर एकत्रित आणले.

4/10

निरपेक्ष

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

सद्गुरु वामनराव पै सांगतात की, शिवरायांचकडून निरपेक्ष हा गुण शिकावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन निरपेक्ष कार्य केलं. एवढंच नव्हे तर त्यांचा प्रत्येक मावळा हा निरपेक्ष होता. हिंदवी स्वराज्यासाठी प्रत्येकाने कार्य केले. आपणही आपल्या जीवनात वावरताना निरपेक्ष समाजकार्य करायला हवं. 

5/10

उच्च ध्येय

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

छत्रपती शिवरायांनी मोठं ध्येय जगासमोर उभं केलं.  स्वराज्य व्हावा ही तो श्रींची इच्छा.. म्हणतं महाराजांनी वयाच्या अवघ्या 15 वर्षात तोरणा जिंकला. संपूर्ण भारतावर हिंदवी, मराठ्यांचे साम्राज्य असावे हा विचार केला. असाच मोठा विचार आपण आपल्या जीवनात अंगीकारायला हवा. 

6/10

वास्तवाद

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

महाराजांनी यद्धात जेव्हा माघार घ्यायची त्या वेळी माघार घेतली. जेथे गनिमी कावा करणं युचित होतं तेथे मार्ग स्वीकारला. त्यावेळी त्यांनी मोडेन पण वाकणार नाही असं नाही. पाहिजे तिथे जसंच्या तसं चोख उत्तर, प्रसंगावधन राखून महाराजांनी कार्य केलं. सद्गुरु सांगतात असंच प्रत्येकाने जीवनात सुवर्णमध्य साधायला हवा.वास्तववाद स्वीकारुन तेव्हाच्या परिस्थितीवर निर्णय घेणे गरजेचे असते. 

7/10

गुरुंच महत्त्व

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात सद्गुरुंना अतिशय महत्त्व दिलं. स्वराज्य व्हावा ही तो श्रींची इच्छा.. म्हणतं महाराजांनी महाराष्ट्र आणि देशभर भगवा फडवला. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली गुरु त्यांची आई जिजाबाई. समर्थ रामदास स्वामींना देखील शिवराय गुरु मानतात. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात गुरु आणि सद्गुरुंच महत्त्व अनन्य साधारण आहे. 

8/10

सृजनशीलता

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवरायांचा गौरव होतो. महाराज खूप कल्पक विचारसरणीचे आणि सृजनशील म्हणजेच क्रिएटिव्ह होते. आरमार स्थापना हे त्यावेळी मोठे काम होते. आरमार उभारण्यामागे तीन कारणे म्हणजे स्वराज्य विस्तार, स्थानिकांना रोजगार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण. जगाचा वेध घेण्याची क्षमता, जल व्यवस्थापन, युद्धनीती, परकीय संबंध, आर्थिक धोरणे या सर्वांमध्ये महाराजांची सर्जनशीलता दिसून येते.अशी सृजनशीलता प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजे.   

9/10

निवड

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

महाराजांनी कायमच जीवनात योग्य माणसाची निवड केली. योग्य माणसावर ते योग्य कामगिरी सोपवायचे. यामुळे कोणतंही काम असो किंवा कोणतीही मोहिम ती फत्तेच व्हायची. आपणही जीवनात योग्य व्यक्तीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. 

10/10

संयम

Chhatrapati Shivaji Maharaj 10 Life Skills Qualities

जीवनात संयम अत्यंत महत्त्वाचा असतो. महाराजांनी हा संयम कायम बाळगला. छत्रपती शिवरायांचा हा गुण नक्कीच शिकण्यासारखा आहे. महाराजांकडून हा गुण शिकलात तर नक्कीच जीवनात यशस्वी व्हायला मदत होईल यात शंका नाही. महाराजांचे असंख्य गुण आहेत ज्याचे आचरण प्रत्येकाने करायला हवे.