Saving Schemes: गुंतवणूक करण्यासाठी 'या' 5 बचत योजना बेस्टच, बंपर रिटर्न मिळण्याबाबत अधिक जाणून घ्या

Investment : गुंतवणूक करताना नेहमी काळजी घ्यावी. तसेच गुंतवणूक खात्रीशील असावी आणि गुंतवणूक करताना दुहेरी फायदे जाणूनही घेतले पाहिजे. सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळते आणि कसलीही चिंताही राहत नाही. अधिक जाणून घ्या.

| Mar 10, 2023, 08:00 AM IST

Investment Tips : बरेचवेळा आपण गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत असतो. मात्र, गुंतवणूक करताना काळजी घेतली नाही तर फायद्या ऐवजी तोटा होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी काळजी घ्यावी. तसेच गुंतवणूक खात्रीशील असावी आणि गुंतवणूक करताना दुहेरी फायदे जाणूनही घेतले पाहिजे. जर तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल ज्यामध्ये तुम्हाला करबचतीसह चांगला परतावा मिळेल. सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या  छोट्या बचत योजनांबद्दल जाणून घ्या. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळते आणि कसलीही चिंताही राहत नाही.

1/5

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. यामध्ये तुम्हाला वर्षाला 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. यामध्ये 60 वर्षांवरील कोणताही नागरिक लाभ घेऊ शकतो. यामध्ये तुम्हाला संयुक्त खात्यावरही लाभ मिळतो.

2/5

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या योजनेत बचत करणे खूपच फायद्याचे आहे. या योजनेत तुम्हाला चक्रवाढीचा लाभही मिळतो. सध्या 7.1 टक्के परतावा मिळत आहे. दरवर्षी तुम्ही त्यात किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करु शकता. यामध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत करात सूटही मिळते.

3/5

सुकन्या समृद्धी योजना

 सुकन्या समृद्धी योजना

गुंतवणुकीसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) चांगली आहे. मुलींचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरु केली गेली आहे. या योजनेत 7.6 टक्के रिटर्न मिळतो. येथे गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते.

4/5

पोस्टात या योजनेत करु शकता गुंतवणूक

पोस्टात या योजनेत करु शकता गुंतवणूक

किसान विकास पत्र (KVP) ही एक गुंतवणुकीसाठी चांगली योजना आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.2 टक्के परतावा मिळेल. किसान विकास पत्रामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची कर सूट मिळत नाही. यामध्ये 10 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात आणि दुप्पट परत मिळतात.

5/5

नॅशनल सेव्हिंग स्कीम

नॅशनल सेव्हिंग स्कीम

नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये (NSS) गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 7 टक्के परतावा मिळतो. यामध्ये 5 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते.