Savitribai Phule : देशातील पहिल्या महिला शिक्षिकेच्या संघर्षाची कहाणी, 10 महत्त्वाच्या गोष्टी घ्या जाणून
Savitribai Phule Death Anniversary: सावित्रीबाई फुले यांची 10 मार्च 2024 रोजी 127 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त त्यांच्या जीवनातील 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया.
Savitribai Phule Death Anniversary: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, सावित्रीबाई फुले या देशाच्या इतिहासातील सर्वात उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक होत्या. सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, कवयित्री आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्यांचा 10 मार्च 1897 रोजी बुबोनिक प्लेगशी लढा देत अखेरचा श्वास घेतला. भारतीय सामाजिक सुधारणा चळवळ आणि महिलांच्या हक्कांसाठीच्या लढ्यात त्यांचे योगदान आजही लोकांना प्रेरणा देत आहे. भारताच्या पहिल्या आधुनिक स्त्रीवादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. पण सावित्रीबाई फुले कोण होती? ती कुठली होती? तिच्या आयुष्यावर एक नजर टाकूया.