राज्यपालांच्या सूचनानंतर बदलली शाळांची वेळ; दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊनंतर

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळांबाबत चर्चा सुरु आहे. विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही,त्यामुळे शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण विभागाला केली होती. त्यानंतर आता राज्याच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Dec 19, 2023, 09:51 AM IST
1/7

school timing

येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

2/7

governor ramesh bais school time

अलीकडच्या काळात सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी राहतात. पण, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते व त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केली.

3/7

governor ramesh bais

मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी ‘पुस्तक – विहीन’ शाळा, ई – वर्ग यांना चालना द्यावी. तसेच शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करावे, अशाही सूचना राज्यपालांनी केल्या होत्या.

4/7

School administrators

राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांची वेळ बदलण्याची सूचना योग्य असली तरी तिची अमंलबजावणी व्यवहार्य नाही असे मत शिक्षण संस्थाचालकांनी व्यक्त केले होते. सकाळच्या सत्रातील शाळांमुळे विद्यार्थ्यांची झोप होत नाही हे म्हणणे योग्य असले, तरी शाळेची वेळ बदलणे अनेक ठिकाणी शक्य होणार नाही, असे संस्थाचालकांनी म्हटलं होतं.

5/7

deepak kesarkar

राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

6/7

deepak kesarkar minister

पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे  सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

7/7

Kindergarten

तसेच बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे.