KL Rahul क्रिकेटमधून घेणार ब्रेक, लग्नाचं कारण की आणखी काही?
KL Rahul Marriage: केएल राहुलने BCCI कडे का मागितला ब्रेक, इतकी घाई कसली?
KL Rahul Marriage: बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेट (Cricket) ही दोन्ही क्षेत्र नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील कलाकार आणि क्रिकेटमधील खेळाडू याच्यांमधील नेहमीच संबंध पाहायला मिळतात. असंच एक जोडपं चर्चेचा विषय आहे. अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये (Relationship) आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाचीही चर्चा सुरू आहे. लग्नासंदर्भात राहुल आणि अथियाच्या पालकांचीही भेट झाल्याचे बोलले जात होते. आता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल अथियासोबत लग्न (marriage) करणार असल्याचं वृत्त आहे. यासाठी त्यांनी बीसीसीआयकडून (BCCI) सुटीही घेतली असून त्यांची रजाही मंजूर करण्यात आली आहे. (Insatagram @ klrahul/athiyashetty)