Shani Dev Upay : परमा एकादशीला खास योगायोग! 'या' उपायांनी मिळणार शनिदेवांचा आशीर्वाद

Shani Sade Sati Dhaiya Upay : श्रावण अधिक मासातील परमा, कमला एकादशी आहे. विष्णुदेवासोबत शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी आजचा सर्वात्तम दिवस आहे.  

| Aug 12, 2023, 08:03 AM IST

Shani Sade Sati Dhaiya Upay : अधिक मास कृष्ण पक्षातील एकादशी असून आज शनिवार आहे. म्हणजे आज विष्णुदेवासोबत शनिदेवाला प्रसन्न करण्याचा दिवस आहे. आज हर्ष हा शुभ योगही जुळून आला आहे. 

 

1/6

त्यामुळे एकादशीच्या (Parama Ekadashi Upay)शुभ मुहूर्तावर काही विशेष उपाय केल्यास शनीची साडेसाती आणि साडेसातीपासून मुक्ती (Shani Dosh Upay)मिळते.  

2/6

परमा एकादशी आणि शनिवारचा योगायोग असल्याने शनिदेवाला तेलाचा अभिषेक करा. काळे तीळ, काळे उडीद दान करावे. गरिबांना शूज आणि चप्पल भेट म्हणून द्या. सूर्यास्तानंतरच शनिदेवाची पूजा करणं शुभ मानलं जातं. 

3/6

कावळा हे शनिदेवाचं वाहन आहे, परमा एकादशीच्या दिवशी कावळ्यांना खाऊ दिल्याने शनिदोष दूर होतो आणि पितरांनाही आनंद मिळतो. विशेषत: एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला समाधान मिळतं असं म्हणतात. 

4/6

शनिदेवाची साडेसाती चालू असल्याने परमा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावाव. शिवाय दशरथ रचित शनि स्तोत्राचं पठण करा. शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

5/6

शनिवारी एकादशीचा योगायोग अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी मुंग्यांना पीठ आणि माशांना धान्य खायला द्या. यातूनही शनिदेवाची कृपा प्राप्त होते. या उपायाने सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते.

6/6

परमा एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना पैसे, अन्न किंवा काळे वस्त्र दान करा. यामुळे शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. यासोबतच आर्थिक संकटातूनही सुटका मिळते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)