Shani Dev: शनिवारी खास योग जुळून आल्याने करा हे उपाय, शनिदेवांची होईल कृपा

Shani Upay: ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवांना समर्पित दिवस आहे. या दिवशी शनिदेवांची उपासना केली जाते. 26 नोव्हेंबरच्या शनिवारी खास योग जुळून आला आहे. पंचांगानुसार चंद्र धनु राशीत, तर वृश्चिक राशीत सूर्य-बुध-शुक्र ग्रह युती करत आहेत. तर शनि मकर राशीत मार्गस्थ अवस्थेत आहेत. त्यामुळे या दिवशी खास योग तयार झाला आहे. 

Nov 25, 2022, 16:55 PM IST
1/5

Shani Dev

शनिची साडेसाती आणि अडीचकी सुरु असेल तर त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर कुंडलीत शनि अशुभ स्थितीत असेल, तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

2/5

Shani Dev

शनि पीडा असताना अत्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करावेत. या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणींपासून मुक्ती मिळते. कामातील अडथळे दूर होतील.

3/5

Shani Dev

सध्या धनु, मकर, कुंभ या राशींना शनिची साडेसाती सुरु आहे. तर मिथुन व तूळ राशीला अडीचकी सुरु आहे. त्यामुळे या 5 राशीच्या लोकांनी या शनिवारी काही खास उपाय अवश्य करावेत.

4/5

Shani Dev

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करा. शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाखालीही दिवा लावावा. शनिशी संबंधित वस्तूंचे दान करा. शनि चालिसा वाचा. गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करा. 

5/5

Shani Dev

शनि साडेसाती आणि अडीचकी काळात गरीब आणि गरजूंना त्रास देऊ नका. त्यांचा अपमानही करू नका. कोणाचीही फसवणूक करू नका. मोकाट जनावरांचा छळ करू नका. जे कष्ट करतात त्यांचा अपमान करू नका, त्यांना दुखवू नका. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)