Shani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 'या' राशींवर कोसळणार संकट

Shani Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता शनि वक्री होणार आहे. म्हणजे लवकरच शनी उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींच्या लोकांवर संकट कोसळणार आहे.

Apr 26, 2023, 10:17 AM IST

Shani Vakri 2023 : शनिदेव हा कुठल्याही राशीत अडीच वर्ष वास करतो. त्यानंतर तो आपलं घर बदलतो. न्याय आणि कर्माची देवा शनि लवकरच विरुद्ध दिशेने चालणार आहे. त्यामुळे याचा परिणाम सगळ्या 12 राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. काहीसाठी हा काळ शुभ असणार आहे तर काही राशींसाठी तो कठीण ठरणा आहे. (shani vakri 2023 date bad effects on these zodiacs sign Astrology in marathi)

1/7

कधी होणार शनी वक्री?

शनीदेव सध्या कुंभ राशीत आहे. तो 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीतून मागे फिरणार आहे. शनि 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 8.26 पर्यंत वक्री राहणार आहे. त्यानंतर तो मार्गी लागणार आहे. 

2/7

या राशींवर साडेसाती सुरु

सध्या शनी कुंभ राशीत असल्याने मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनि सतीचा (Shani Sade Sati) प्रभाव चालू आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनि धैय्या (Shani Dhaiya) आहे. 

3/7

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना शनि वक्रीमुळे कठीण प्रसंगाचा सामना करावा लागणार आहे. होणाऱ्या कामांमध्येही तुम्हाला अडचणी येणार आहे. आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. वादविवाद होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात तणाव जाणवणार आहे. 

4/7

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी शनि वक्री आव्हात्मक असणार आहे. नोकरदार वर्गासाठी कामाचा तणाव वाढणार आहे. आर्थिक हानी होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 

5/7

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी शनि वक्री शुभ काळ घेऊन आला आहे. या काळात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक फटका आणि अनेकांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे.

6/7

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी शनि वक्री अनेक अडचणी घेऊन येणार आहे. नोकरदारांना सतर्क राहण्याची गरज आहे. व्यवसायीकांनी गुंतवणूक करताना शंभर वेळा विचार करावा. आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या. 

7/7

कुंभ (Aquarius)

सध्या शनि कुंभ राशीत आहेत. जेव्हा शनि वक्री होणार आहे त्याचा सर्वाधिक फटका कुंभ राशीच्या लोकांना होणार आहे. शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. करिअरबद्दल गांभीर्याने लक्ष द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)