Mahashivratri 2024 : शिव-पार्वतीचं नातं जगातील पहिला प्रेम विवाह; नात्यातून पती- पत्नीला शिकता येतील 'या' गोष्टी
शंकर-पार्वती यांचा विवाह सोहळा दरवर्षी 'महाशिवरात्री' चा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दोघांचं लग्न हे जगातील पहिला प्रेम विवाह असल्याचं सांगण्यात येतं. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या नात्यातील खास गोष्ट.
महाशिवरात्री हा उत्सव महादेवाला समर्पित असलेला प्रमुख हिंदू सण आहे. शुक्रवारी 8 मार्च 2023 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षभरात 12 शिवरात्री आहेत. माघ किंवा फाल्गुन महिन्यातील शिवरात्री सर्वात शुभ मानली जाते आणि 'महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते. या दिवशी, वाराणसीतील काशी विश्वनाथ ते उज्जैनमधील महाकाल मंदिर ते ओडिशाच्या भुवनेश्वरमधील श्री लिंगराज मंदिरापर्यंत, हजारो भाविक भगवान शिव आणि त्यांची पत्नी मात पार्वतीची प्रार्थना करण्यासाठी देशभरातील शिव मंदिरांमध्ये गर्दी करतात. जगभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक भाविक शिवा-पार्वतीच्या मनोभावे आराधना करतात. शिव-पार्वती यांचं नातं हे जोडीदाराला कशी साथ द्यावी याचं उदाहरण आहे.