अमेरिकेत का साजरा करतात Shreya Ghoshal Day? कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

26 जून हा अमेरिकेतील एका शहरात 'श्रेया घोषाल डे' म्हणून साजरा करण्यात येतो. हे वाचून तुम्हाला नक्कीच सुखद धक्का बसला असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? श्रेयावरं इतकं प्रेम की चक्क 'श्रेया घोषाल डे' साजरा करतात. चला तर आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असं का आहे ते जाणून घेऊया...

Mar 12, 2023, 16:53 PM IST

Shreya Ghoshal Birthday : बॉलिवूडची लोकप्रिय प्ले बॅक सिंगर श्रेया घोषालचा (Shreya Ghoshal ) आज वाढदिवस आहे. श्रेया आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करते. श्रेया या वयातही लाइव्ह शो करताना दिसते. श्रेयाच्या आवाजनं अनेकांना वेड लावलं आहे. श्रेयानं फक्त भारतीय नाही तर परदेशातील लोकांनाही तिच्या आवाजानं वेड लावलं आहे. तुम्हावा वाचून आश्चर्य होईल पण श्रेयाविषयी खूप एक मोठी गोष्ट आहे. श्रेयाच्या नावानं अमेरिकेत एक खास दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. 

 

1/6

Shreya Ghoshal Birthday special

श्रेया घोषालचा जन्म पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे 1984 साली झाला होता. श्रेया जेव्हा 4 वर्षांची होती तेव्हा पासून तिनं संगीतचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला श्रेयाला तिच्या आईनं संगीताचे धडे दिले. 

2/6

Shreya Ghoshal Birthday special

श्रेया जेव्हा 6 वर्षांची होती तेव्हा तिनं क्लासिकल संगीतचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा श्रेया ही 16 वर्षांची झाली तेव्हा तिनं सारेगामापा चाइल्ड स्पेशल या शोचा खिताब तिच्या नावावर केला होता. त्यानंतर श्रेयानं मागे वळून पाहिलं नाही. 

3/6

Shreya Ghoshal Birthday special

'देवदास' या चित्रपटासाठी श्रेयानं 'बैरी पिया' हे गाणं गायलं होतं. हे गाणं ज्यावेळी प्रेक्षकांनी ऐकलं त्यावेळी सगळ्यांना तिच्या आवाजानं मंत्रमुग्ध केलं होतं. श्रेयानं सिलसिला ये चाहत का आणि डोला रे डोला ही गाणी देखील गायली होती. 

4/6

Shreya Ghoshal Birthday special

श्रेयाचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. श्रेयाच्या चाहत्यांमध्ये अमेरिकेते गवर्नर देखील आहेत. आता श्रेया घोषाल डे कसा साजरा करण्यात येतो याविषयी जाणून घेऊया.   

5/6

Shreya Ghoshal Birthday special

2010 साली श्रेया अमेरिकेतील ओहिया येथे गेली होती. तिथले गवर्नर टेड स्ट्रिकलॅंड हे श्रेयाचा आवाज ऐकताच तिचे चाहते झाले, तेव्हा पासून गवर्नर यांनी 26 जून श्रेया घोषाल डे हा साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली होती. 

6/6

Shreya Ghoshal Birthday special

श्रेया घोषाल ही भारतातील पहिली गायिका आहे, जिचा वॅक्सचा स्टॅच्यु दिल्लीच्या मॅडम तुसाद म्युजियममध्ये आहे.