श्वेता तिवारीचा स्विमिंग पूलमधील हॉट अंदाज
श्वेता आणि तिची मुलगी पलक तिवारी सतत स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. ती सध्या 'मेरे डॅड की दुल्हन' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. नुकताच मालिकेतील लग्नाचं शूट पूर्ण झालं. त्यामुळे श्वेता स्विमिंग पूलमध्ये विश्रांती करतना दिसत आहे. शुटींग संपल्यानंतर ती कर्जतमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. श्वेता आणि तिची मुलगी पलक तिवारी सतत स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. शिवाय तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. स्विमिंग पूलमधील हॉट अंदाजातील तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.