उन्हाळ्यात कॉफी पिणं कितपत चांगलं? जाणून घ्या आरोग्याला होणारे धोके

Drink Coffee In Summer: चहाप्रमाणे कॉफीचेही प्रचंड चाहते आहेत. काही लोक फक्त लाईफस्टाइलसाठी कॉफीचं सेवन करतात. काहींना तर कॉफी इतकी आवडते की, दिवसभरात कधीही ते कॉफीचं सेवन करु शकतात. जर तुम्हालाही कॉफी प्रचंड आवडत असेल तर त्यामागे असणारे धोकेही समजून घ्या.   

Apr 26, 2023, 11:59 AM IST
1/5

Drink Coffee In Summer: आज कॉफी अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेकांना दिवसभरात कधीही कॉफीचं सेवन करण्यास आवडतं. कॉफीप्रेमी नेहमीच चहाप्रेमींसह वाद घालत कॉफी पिणं शरिरासाठी कसं फायद्याचं आहे हे सांगत असतात. मात्र सध्या इतक्या उकाड्यात कॉफी पिणं चांगलं आहे का? असा प्रश्न सध्या कॉफीप्रेमींना सतावत आहे.   

2/5

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कॉफीमध्ये कॅफिन असतं, ज्यामुळे वारंवार टॉयटेलटला जावं लागतं. यामुळे शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास उद्भवतो.   

3/5

तज्ज्ञांनुसार, योग्य प्रमाणात कॉफी प्यायल्यास ती शरिरासाठी फायद्याची असते. उकाड्यातही आपण कॉफीचं सेवन करु शकतो, पण त्याचं प्रमाणो योग्य असलं पाहिजे.  

4/5

अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनानुसार, एका निरोगी व्यक्तीने दिवसाला 400 मिलीग्राम (4 ते 5 कप) पेक्षा जास्त कॉफीचं सेवन करु नये. रोज किती कप कॉफीचं सेवन करावं हे प्रत्येकाच्या मेटाबॉलिकवर अवलंबून असतं.   

5/5

या सर्व मुद्द्यांवरुन तुम्ही उन्हाळ्यात कॉफीचं सेवन करु शकता हे सिद्ध होत आहे. फक्त हे प्रमाण योग्य असण्याची गरज आहे. अन्यथा आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतं.