बडीशेपचे पाणी पिणे या लोकांसाठी असू शकते हानिकारक; फायद्याऐवजी होईल नुकसान

रात्रीचे जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी बडिशेप खाल्ली जाते. त्याचबरोबर बडिशेपचे पाणी पिणेही आरोग्यासाठी फायद्याचे असते. पण काहीजणांना बडिशेपचे पाणी पिणे हानिकारक ठरु शकते. कसं ते जाणून घेऊया. 

| Dec 13, 2023, 18:40 PM IST

रात्रीचे जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी बडिशेप खाल्ली जाते. त्याचबरोबर बडिशेपचे पाणी पिणेही आरोग्यासाठी फायद्याचे असते. पण काहीजणांना बडिशेपचे पाणी पिणे हानिकारक ठरु शकते. कसं ते जाणून घेऊया. 

1/7

बडीशेपचे पाणी पिणे या लोकांसाठी असू शकते हानिकारक; फायद्याऐवजी होईल नुकसान

Side Effects of Fennel Seeds Water in marathi

बडिशेपचे पाणी प्यायल्यामुळं पोटासंबंधी सर्व समस्या दूर होतात. तसंच आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी दूर होतात. तसंच बडिशेपचे पाणी प्यायल्यामुळं शरीर पूर्णदिवस हायड्रेट राहिलं. पण काही जणांनी चुकूनही बडिशेपचे पाणी पिऊ नये. 

2/7

नुकसान

Side Effects of Fennel Seeds Water in marathi

जसं प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसे त्याचे नुकसानही आहेत. बडिशेपचे पाणी सर्वांसाठीच फायदेशीर नसते. काही जणांसाठी बडिशेपचे पाणी पिणे नुकसानदायक ठरु शकते. जाणून घेऊया सविस्तर

3/7

गरोदरपणा

Side Effects of Fennel Seeds Water in marathi

गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी बडिशेपचे पाणी फायदेशीर असते मात्र, ते प्रमाणात घ्यावे. अति प्रमाणात बडिशेप आणि त्याचे पाणी प्यायल्याने महिलांसाठी हानिकारक ठरु शकते. तसंच, गर्भातील बाळावरही त्याचा परिणाम होतो.   

4/7

अॅलर्जी

Side Effects of Fennel Seeds Water in marathi

काही जणांची त्वचा सेन्सेटिव्ह असते आणि छोट्या छोट्या गोष्टींचा त्यावर परिणाम होतो. बडिशेपच्या पाण्यामुळं त्वचेवर परिणाम होतो आणि चेहऱ्यावर पुरळ किंवा पिंपल्स येऊ शकतात.

5/7

लो ब्लड शुगर

Side Effects of Fennel Seeds Water in marathi

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ज्यांच्या शरीरातील शुगर लेव्हल कमी असेल त्यांनी आपल्या जेवणाबाबत अधिक काळजी घ्यायची गरज आहे. बडिशेपचे पाणी लो शुगल लेव्हल असलेल्या लोकांनी पिऊ नये. यामुळं शुगर लेव्हल कमी होऊ शकते. 

6/7

ब्लड क्लॉटिंग

Side Effects of Fennel Seeds Water in marathi

बडीशेपचे पाणी प्यायल्याने रक्त गोठण्याची समस्या उद्भवू शकते. एका विशिष्ट्य जातीच्या बडीशेप बियांमध्ये इथेनॉल आढळते जे रक्त पातळ करण्यास मदत करते. रक्ताशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

7/7

Disclaimer

Side Effects of Fennel Seeds Water in marathi

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)