स्मार्टफोनच्या अतिवापर करताय? मग वेळीच थांबवा, अन्यथा होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Side Effects of Smartphone News In Marathi : गेल्या काही वर्षात स्मार्टफोनच्या वापरात कमालीची वाढ झाली आहे. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फोनमध्ये मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोप, स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता कमी होते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आलिकडच्या काळात सांधेदुखीसह स्नायूंशी संबंधित अनेक समस्या वाढल्या आहेत. लहान मुले तर गरजेपेक्षा जास्त वापर करताना दिसत आहे. 

Jun 03, 2023, 14:55 PM IST
1/6

स्नायू आणि हाडांवर ताण

smartphone addiction

स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे हात आणि मनगटात वेदना होतात. मग हातांना मुंग्या येणे, हात सुन्न होणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. स्मार्टफोन हातात धरल्याने स्नायू आणि हाडांवर ताण येतो.    

2/6

हँड-आर्म कंपन सिंड्रोम

smartphone addiction

जे मुले मोबाईल फोन, टॅब्लेट किंवा व्हिडिओ गेम खेळतात त्यांना हँड-आर्म व्हायब्रेशन सिंड्रोम विकसित होऊ शकतो. या परिस्थितीमुळे मुले मोबाईल वापरतात तेव्हा त्यांच्या हाताला असह्य वेदना होतात.  

3/6

क्रॅम्प आणि कोपर दुखणे

smartphone addiction

स्मार्टफोन सतत हातात धरून ठेवल्याने हाताला पेटके येऊ शकतात. तसेच कोपर वाकलेले असल्याने त्याला दुखापत होऊ शकते. 

4/6

De Quervain tenosynovitis चा त्रास

smartphone addiction

मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूच्या मधल्या भागात वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे तळहाताची हालचाल करणे कठीण होते. डी क्वेर्व्हेनच्या टेनोसायनोव्हायटीसमुळे अंगठ्याच्या स्नायूवर ताण येतो.

5/6

Osteoarthritis चा धोका

smartphone addiction

सतत मोबाईल टायपिंग केल्याने हाताच्या हाडांमध्ये पहिल्या कार्पोमेटाकार्पल जॉइंटचा ऑस्टियोआर्थरायटिस होण्याची शक्यता असते. सोप्या शब्दात सांगायचे तर हाताच्या स्नायू आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात. हा रोग विशिष्ट वयानंतर होतो. पण मागील काही वर्षात अने तरुण या समस्येचा सामना करत असल्याचे पाहायला मिळते. 

6/6

मान आणि खांदे दुखणे

smartphone addiction

जर तुम्ही दररोज दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोन वापरत असाल मान, खांदे असे अवयव दुखू शकतात. याशिवाय पाठदुखीचा त्रासदेखील होऊ शकतो. जर तुम्ही झोपू फोन वापरत असाल तर हा त्रास वाढू शकतो.    (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)