ही TRICK वापरुन करा फ्री कॉल, कुणालाही दिसणार नाही तुमचा फोन नंबर

Apr 15, 2018, 17:23 PM IST
1/7

तुम्ही तुमचा मोबाईल नंबर न दाखवता कुणालाही कॉल करु शकता? असे तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही ना? पण असं शक्य आहे आणि त्यासाठी पैसेही खर्च करण्याची गरज नाहीये. तुम्हाला केवळ एक अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही कुणालाही फ्री मध्ये कॉल करु शकता. तसेच कॉल केल्यावर समोरील व्यक्तीला तुमचा फोन नंबरही दिसणार नाही.

2/7

फ्री मध्ये कॉल करण्यासाठी तुम्हाला फ्री कॉलिंगचं अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावं लागणार आहे. या अॅपचं नाव IndyCall असं आहे. याच्या माध्यमातून तुम्ही कधीही आणि कितीही वेळ फ्री कॉलिंग करु शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही भारताच्या कुठल्याही भागात कॉल करु शकता. खास बाब म्हणजे तुम्ही कॉल करत असताना कुणालाही तुमचा फोन नंबर दिसणार नाही. मात्र, हे अॅप वापरताना तुमच्या फोनमध्ये डेटा पॅक असणं आवश्यक आहे.  

3/7

जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट सुरु नसेल तर हे अॅप काम करणार नाही. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एका नंबरवरुन कॉल करु शकता. तुम्ही या अॅपवरुन कॉल केल्यास समोरील व्यक्तीच्या स्क्रिनवर नंबर दिसेल. प्रत्येकवेळी कॉल करताना नवा नंबर दिसल्यास कुणालाही कळणार नाही की नेमकं कोण कॉल करत आहे. तसेच ट्रू कॉलरनेही हा नंबर ट्रेस करता येत नाही.  

4/7

अॅप इंस्टॉल केल्यावर फोन स्लो होतो. फोनमधील अनेक सेटिंग्स अशा असतात ज्या फोनला अॅडवान्स बनवतात. हे सेटिंग्स बदलताच फोन सुरक्षित आणि फास्ट होतो. फोनच्या स्क्रिनवर येणारे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक नोटिफिकेशन्सही तुम्ही बंद करु शकता.  

5/7

फोनचे नोटिफिकेशन्स बंद करण्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तुम्ही स्क्रिनवर येणारे नोटिफिकेशन्स इतर कुणही पाहू शकणार नाही. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी नोटिफिकेशनवर टॅप करुन सेटिंग आयकॉनवर टॅप करा. यानंतर ऑन द लॉक (On the lock screen) वर टॅप करा. आता हाईड सेंसेटिव्ह नोटिफिकेशन कंटेंट सिलेक्ट करा. यानंतर तुम्हाला येणारे कुठलेही नोटिफिकेशन्स तुमच्या फोन स्क्रिनवर दिसणार नाहीत.  

6/7

अनेकदा फोनच्या स्क्रिनवर जाहिराती दिसतात. या जाहिराती एखादं अॅप इंस्टॉल केल्यावर येऊ शकतात. अशा जाहिराती बंद करण्यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये  गुगल अॅड्स Opt out of Ads Personalization ला ऑन करावं लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर अनावश्यक जाहिराती दिसणार नाहीत. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी आणि परफॉरमन्सही चांगला होईल.  

7/7

फोनमधील व्हायरसला तुम्ही कंटाळला आहात तर चिंता करण्याची गरज नाहीये. एक पर्याय आहे ज्यामुळे तुमच्या फोनमध्ये व्हायरस येणार नाही. अनेकदा अॅप्सच्या माध्यमातून फोनमध्ये व्हायरस येतात. मातर्, एक सेटिंग ऑन केल्यास तुम्हाला व्हायरसा धोका राहणार नाही. यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन गुगल आणि सिक्युरिटीवर टॅप करा. या ठिकाणी गुगल प्ले प्रोटेक्ट ऑन करा.