पोटाची चरबी कमी करायचीये? रोज करा 'ही' योगासने, पाहा मग फरक
Yoga For Reduce Belly Fat : दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. याचनिमित्ताने आपण जे लोक जास्त वेळ बसून काम करतात. त्यांसाठी काही योग प्रकार सांगणार आहोत. जेणेकरुन वाढते वजन तसेच पोटाची चरबी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. योगामुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाहीतर मनालाही शांतात मिळते. योग हा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असून शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि स्नायूंना बळकटीही मिळते. मग जाणून घ्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त योगासने आणि त्यांचे फायदे.