Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

Nov 13, 2020, 07:29 AM IST
1/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील 

2/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

दिवाळीच्या सणाची लगबग सुरु झालेली असतानाच आता हा सण थेट आपल्या दाराशी आला आहे. अशा या सणाच्या स्वागतासाठी सर्वजण आपापल्या परिनं सज्ज होत आहेत. 

3/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

फराळापासून घराची साफसफाई आणि घर सरजवण्यापर्यंत सर्वांचीच लगबग पाहायला मिळत आहे. यामध्ये सानथोर अशा साऱ्यांचाच सहभागही पाहायला मिळत आहे. 

4/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात मागे नाहीत. गायक राहुल देशपांडे यांनंही दिवाळीच्या निमित्तानं त्याच्यातील आणखी एका कलेला सर्वांसमक्ष आणलं आहे. ही कला आहे Diwali 2020 च्या निमित्तानं खास कंदील बनवण्याची. 

5/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

राहुलनं मुलगी आणि पत्नी यांच्या साथीनं सुरेख असा बहुरंगी कंदील बनवत या प्रकाशाच्या सणाचं स्वागत केलं आहे. 

6/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

सोशल मीडियावर त्यानं या क्षणांचे काही फोटोही शेअर केले. ज्यामध्ये कंदील साकारतेवेळी त्याची चिमुकली लेकही तितक्याच उत्साहात आणि कुतुहलानं या प्रक्रियेत सहभागी होत असल्याचं पाहायला मिळालं. 

7/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

यापूर्वी कधीच मला आकाश कंदील साकारताना इतकी मजा आली नव्हती. रेणुका आणि नेहाच्या साथीनं हा आकाश कंदील साकारणं ही या महामारीच्या काळातील एक खास बाबच, असं कॅप्शन लिहित त्यानं आपला आनंद शब्दांवाटे व्यक्त केला. 

8/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

सर्वच चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यानं सर्वांच्याच चांगल्या आरोग्यासाठीही सदिच्छा दिल्या. 

9/9

Diwali 2020 : लाडक्या लेकीसह राहुल देशपांडेनं बनवला सुरेख कंदील

(सर्व छायाचित्रं- राहुल देशपांडे/ फेसबुक)