अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा हटके लूक

प्रार्थना लवकरच 'छूमंतर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

Nov 12, 2020, 17:04 PM IST

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लवकरच 'छूमंतर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी समीर जोशी यांच्या खांद्यावर आहे. प्रार्थनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. ती सतत स्वतःचे नव्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील तिचा हटके लूक सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6