Anti Aging: 50 व्या वर्षीही तुम्ही दिसाल तीशी सारखे, झोपण्यापूर्वी करा हे काम

 Health Benefit : चेहऱ्यावर काळे डाग, डाग, सुरकुत्या आणि त्वचा कोरडी पडणे यासारख्या समस्या दिसत असतील तर...

Sep 07, 2022, 11:47 AM IST

मुंबई : Skin Care Tips : प्रत्येकाला नेहमीच तरुण दिसावे असे वाटते. पण वाढत्या वयाबरोबर त्वचेचे नुकसान होऊ लागते. जसजसे वय वाढते तसतसे चेहऱ्यावर काळे डाग, डाग, सुरकुत्या आणि त्वचा कोरडी पडणे यासारख्या समस्या दिसू लागतात. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या अधिक गडद होताना दिसून येत आहे. अस्वास्थ्यकर आहार, अल्कोहोल, कॅफिन, झोप आणि व्यायामाचा अभाव, प्रदूषण यासारख्या गोष्टींमुळे लोक लवकर वृद्ध होताना दिसून येत आहे. या सुरकुत्यांमुळे चेहऱ्यावर काळी वर्तुळे निर्माण होतात. पण तुम्हाला माहित आहे का की, घरगुती उपायांच्या मदतीने आपण वृद्धत्वाची समस्या थांबवू शकतो. तसेच वृद्धत्वामुळे होणारे नुकसान दूर करु शकतो. यासाठी मी तुम्हाला काही टीप्स उपयोगी पडतील.

 

1/5

आयुर्वेदानुसार गुलाब पाण्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. याचा वापर करून तुम्ही तरुण दिसू शकता. यासाठी गुलाब पाण्याचे काही थेंब बेंबी आणि बेंबीचा भाग नंतर बोटाने मसाज करा. यामुळे तुम्ही अनेक वर्षे तरुण दिसाल.

2/5

वृद्धत्वाची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. त्वचा मुलायम आणि निरोगी बनवण्यासाठी तूप हा एक नैसर्गिक उपाय आहे. तुम्ही थोडे तूप गरम करून झोपण्यापूर्वी त्याचे काही थेंब बेंबीत टाका. नंतर बोटाने मसाज करा.

3/5

तुम्ही तरुण दिसण्यासाठी बदामाचे तेलही वापरू शकता. याचे अनेक स्किन केअर फायदे आहेत. बदामाच्या तेलामध्ये फॅटी अ‍ॅसिड असतात, जे निस्तेज आणि कोरड्या त्वचेवर उपचार करतात. यासाठी कोमट बदाम तेलाचे काही थेंब बेंबीवर टाकावे लागतील. मग तुम्हाला मालिश करावी लागेल.

4/5

कडुलिंबाचे तेल तुम्हाला तरुण दिसण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीवर टाका. नंतर बोटाने मसाज करा.

5/5

वृद्धत्वाची समस्या टाळण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. थोडे खोबरेल तेल घेऊन गरम करा. यानंतर काही थेंब बेंबीवर टाकून मसाज करा.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)