Skin Care Tips: तुम्हीपण आंघोळीनंतर ब्रश करता? 'हे' तोटे समजल्यावर आजपासून बंद कराल सवय

सामान्यत: जास्त तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि त्वचेमध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे मुरुमाची समस्या उद्भवते. पण नुकतेच मुरुमांचे आणखी एक कारण समोर आले आहे. जे तुमच्या सवयींशी संबंधित आहे. 

| Jul 21, 2023, 09:55 AM IST

Skin Care Tips:सामान्यत: जास्त तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि त्वचेमध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे मुरुमाची समस्या उद्भवते. पण नुकतेच मुरुमांचे आणखी एक कारण समोर आले आहे. जे तुमच्या सवयींशी संबंधित आहे. 

1/8

Health Tips: तुम्हीपण आंघोळीनंतर ब्रश करता? 'हे' तोटे समजल्यावर आजपासून बंद कराल सवय

Skin Care Tips brush after bathing habit can become the cause of acne

Skin Care Tips: दररोज ब्रश आणि आंघोळ करणे शरीरासाठी चांगले असते. असे केल्याने आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. पण खाण्यापिण्यात निष्काळजीपणा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडतात. तसेच रोजच्या जीवनातील अनेक सवयींमुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुरुम ही यापैकी एक समस्या आहे. सामान्यत: जास्त तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि त्वचेमध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे ही समस्या उद्भवते. पण नुकतेच मुरुमांचे आणखी एक कारण समोर आले आहे. जे तुमच्या सवयींशी संबंधित आहे. 

2/8

तोंडाच्या स्वच्छतेशी संबंधित सवयी

Skin Care Tips brush after bathing habit can become the cause of acne

नुकतीच त्वचा तज्ज्ञ डॉ. गीतिका गुप्ता यांनी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. तोंडाच्या स्वच्छतेशी संबंधित आपल्या सवयी मुरुमांचे कारण कसे बनू शकतात हे त्यांनी सांगितले. आंघोळ केल्यानंतर ब्रश केल्यास पिंपल्स होण्याची शक्यता खूप वाढते, असे डॉक्टर सांगतात. 

3/8

आंघोळीनंतर ब्रश केल्याने पुरळ येतात का?

Skin Care Tips brush after bathing habit can become the cause of acne

जेव्हा आपण ब्रश करतो तेव्हा आपल्या तोंडातून त्वचेवर बॅक्टेरिया जाण्याची शक्यता असते. तोंडातून चेहऱ्याच्या त्वचेवर, विशेषत: तोंडाच्या आणि हनुवटीच्या आजूबाजूला हस्तांतरित होणारे हे जिवाणू जमा होऊ शकतात आणि परिणामी मुरुम फुटू शकतात.

4/8

आंघोळीनंतर ब्रश करणे आणि पुरळ यांचा संबंध काय?

Skin Care Tips brush after bathing habit can become the cause of acne

डॉक्टरांच्या मते, मुरुम हे मुख्यत्वे जास्त तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि बॅक्टेरिया या कारणांमुळे होतात. अशावेळी दात घासताना अनेकदा आपल्या तोंडातून त्वचेवर बॅक्टेरिया जातात, ज्यामुळे मुरुम होतात. 

5/8

आंघोळीपूर्वी ब्रश करण्याचा सल्ला

Skin Care Tips brush after bathing habit can become the cause of acne

याच कारणामुळे आंघोळीपूर्वी ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून ब्रश करताना हनुवटीवर किंवा त्याच्या सभोवतालच्या भागावर येणारे कोणतेही बॅक्टेरिया किंवा टूथपेस्ट आंघोळ करताना धुतले जाऊ शकतात. ज्यामुळे त्वचेची जळजळ आणि मुरुमांचा धोका कमी होतो. यासोबतच त्यांनी निरोगी त्वचेसाठी काही चांगल्या सवयीही सांगितल्या, त्या पुढीलप्रमाणे

6/8

स्वच्छ हात धुवा

Skin Care Tips brush after bathing habit can become the cause of acne

आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी किंवा कोणतेही प्रोडक्ट लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा. असे केल्याने तुम्ही चेहऱ्यावरील बॅक्टेरिया पसरण्यापासून रोखू शकता.

7/8

आपले तोंड धुवा

Skin Care Tips brush after bathing habit can become the cause of acne

दात घासल्यानंतर तोंडाभोवती उरलेली टूथपेस्ट काढून टाकण्यासाठी चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा. तुमचे तोंडही स्वच्छ करा.

8/8

चेहरा साफ करणे

Skin Care Tips brush after bathing habit can become the cause of acne

तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल, घाण आणि अशुद्धता काढून टाकण्यासाठी चेहऱ्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या.