Snakebite: सापाच्या विषामुळे नाही होणार मृत्यू; वैज्ञानिकांनी उंदरांवर केलेला प्रयोग यशस्वी

  विष दिलेले उंदीर 4 तासांच्या आत मरण पावले. पण ज्यांना विष-प्रतिपिंड मिश्रण दिले गेले ते उंदीर 24 तासांच्या निरीक्षण कालावधीनंतर जिवंत राहिले.

| Feb 23, 2024, 15:09 PM IST

Snake Venom Antibodies:  विष दिलेले उंदीर 4 तासांच्या आत मरण पावले. पण ज्यांना विष-प्रतिपिंड मिश्रण दिले गेले ते उंदीर 24 तासांच्या निरीक्षण कालावधीनंतर जिवंत राहिले.

1/8

Snakebite: सापाच्या विषामुळे नाही होणार मृत्यू; वैज्ञानिकांनी उंदरांवर केलेला प्रयोग यशस्वी

Snake Venom Antibodies Solution Scientists made a new discovery

Snake Venom Antibodies:  साप चावल्यामुळे सर्वाधिक मृत्यू भारत आणि सहारा आफ्रिका प्रदेशात होतात. जगात दरवर्षी हजारो लोक साप चावल्यामुळे मरतात. गावच्या ठिकाणीतर पारंपारिक औषध प्रभावी न ठरल्यास भोंदू बाबांकडे जाऊन जीव धोक्यात घातला जातो. 

2/8

विषारी सापांचे विष निष्प्रभ

Snake Venom Antibodies Solution Scientists made a new discovery

पण आता काळजी करण्याची गरज नाही. विषारी सापांचे विष निष्प्रभ करण्यास सक्षम असणारे कृत्रिम मानवी प्रतिपिंड अँटीव्हेनम तयार करण्यात आले आहे.  या प्रतिपिंडाचा प्रभाव पारंपारिक औषधांपेक्षा सुमारे 15 पट जास्त आहे. 

3/8

संशोधन प्रकाशित

Snake Venom Antibodies Solution Scientists made a new discovery

सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन जर्नलमध्ये यासंदर्भातील संशोधन प्रकाशित झाले आहे. अमेरिकेच्या स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी यासंदर्भात माहिती दिली.

4/8

एक महत्वाचे पाऊल

Snake Venom Antibodies Solution Scientists made a new discovery

या संशोधनामुळे सापाच्या विषापासून आपले संरक्षण करू शकणाऱ्या सार्वत्रिक अँटीबॉडी सोल्यूशनच्या दिशेने मानवाने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. 

5/8

अँटीबॉडीज विकसित

Snake Venom Antibodies Solution Scientists made a new discovery

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू येथून पीएचडी करत असलेल्या सेंजी लक्ष्मी यांनी याची माहिती दिली. सर्पदंशाच्या उपचारांसाठी अँटीबॉडीज विकसित करण्याची ही पहिली पायरी असल्याचे त्यांनी सांगितले.

6/8

उंदरांवर प्रयोग यशस्वी

Snake Venom Antibodies Solution Scientists made a new discovery

अँटीबॉडीचा उद्देश जगातील सर्वात विषारी विष असलेल्या थ्री फिंगर टॉक्सिन (3FT) चे परिणाम दूर करणे हा होता, असे संशोधकांनी सांगितले. 

7/8

99 प्रकारांवर प्रभावी

Snake Venom Antibodies Solution Scientists made a new discovery

अँटीबॉडी 3FT च्या 149 पैकी 99 प्रकारांवर प्रभावी आहे. त्याचा प्रयोग उंदरांवर करण्यात आल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे.

8/8

उंदीर 4 तासांच्या आत मरण पावले

Snake Venom Antibodies Solution Scientists made a new discovery

विष दिलेले उंदीर 4 तासांच्या आत मरण पावले. पण ज्यांना विष-प्रतिपिंड मिश्रण दिले गेले ते उंदीर 24 तासांच्या निरीक्षण कालावधीनंतर जिवंत राहिले. एवढेच नव्हे तर पूर्णपणे निरोगी दिसू लागले. विशेष म्हणजे हे अँटीबॉडी मानवी शरीरातच तयार होते.