Virat Kohli: ...म्हणून विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नाही, समोर आलं मोठं कारण

Virat Kohli: गुरुवारी संध्याकाळी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात विराट कोहली एका खास कारणामुळे खेळणार नाहीये.

Jan 11, 2024, 12:11 PM IST
1/7

तब्बल वर्षभरानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माची टी-20 आंतरराष्ट्रीय सिरीजसाठी निवड झाली. 

2/7

मात्र अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचं समजतंय.

3/7

टीम इंडियाचे प्रमुख कोच राहुल द्रविड यांनी बुधवारी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये विराट कोहली त्याच्या वैयक्तिक कारणामुळे पहिल्या टी-20 सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. 

4/7

दरम्यान विराट कोहली का खेळणार नाही हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

5/7

विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिकाचा ११ जानेवारीला वाढदिवस आहे.   

6/7

विराट कोहलीची मुलगी वामिका आज 3 वर्षांची होणार आहे. 

7/7

अशी शक्यता वर्तवण्यात येतेय की, मुलीचा वाढदिवस असल्याने विराट कोहली अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे.