लूक्सपेक्षा प्रेक्षकांनी कलाकारांचे काम पाहावे- सोनाक्षी सिन्हा

May 04, 2018, 10:16 AM IST
1/5

Sonakshi Sinha

Sonakshi Sinha

सौंदर्य आणि लूक्ससाठी नावाजल्या जाणाऱ्या अभिनेत्रींकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टीकोन अधिक प्रगल्भ होण्याची गरज असल्याचे सोनाक्षीला वाटू लागले आहे. त्यासाठी ती म्हणते, प्रेक्षकांनी कलाकारांकडे लूक्सच्या पुढे जात त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करायला हवे.  

2/5

Sonakshi Sinha

Sonakshi Sinha

सोनाक्षी स्ट्रीक्स प्रोफेशनल स्प्रिंग समर २०१८ कलेक्शन मेरीगोल्डच्या लॉन्चिंग सोहळ्यात सहभागी झाली होती. त्यावेळेस तिने नारंगी रंगाचा गाऊन घातला होता.  

3/5

Sonakshi Sinha

Sonakshi Sinha

सोनाक्षीने आयएएनएसशी बोलताना सांगितले की, पूर्वीपासूनच माझी शरीरयष्टी मजबूत आहे. मी देखील बॉडी शेमिंगला बळी पडले होते. पण माझे नेहमीच हे म्हणणे आहे की, तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा काम कसे करता आणि किती लोकांशी जोडले जाता हे महत्त्वाचे आहे.  

4/5

Sonakshi Sinha

Sonakshi Sinha

लवकरच सोनाक्षी हॅप्पी फिर से भाग जाएगी मध्ये झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत डायना पेंटी आणि अभय देओल देखील आहेत.  

5/5

Sonakshi Sinha

Sonakshi Sinha

हा हॅप्पी भाग जाएगीचा सिक्वल आहे. हा सिनेमा २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता याचा सिक्वल २४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य- @sonakshisinha/ Instagram)