PHOTO : 'त्या' एका फोन कॉलने सुरु झाली आलियाच्या आईची Lovestory, 2 मुलांचे वडिलांशी लग्न केल्याचा होत होता पश्चाताप

Entertainment : 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्रीला 2 मुलांचे वडिलांशी लग्न केल्याचा पश्चाताप होत होत्या. त्या एका फोन कॉलने त्यांची प्रेम कहाणी सुरु झाली होती. 

| Oct 25, 2024, 10:45 AM IST
1/7

आलिया भट्टची आई सोनी राजदान ही 80 आणि 90 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यांनी करिअरची सुरुवात इंग्रजी थिएटरमधून केली होती. ब्रिटनमधील बर्मिंघम इथे 25 ऑक्टोबर 1956 ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील काश्मिरी पंडित आणि आई ब्रिटिश-जर्मन होती. त्यांचं बालपण मुंबईत गेले. 

2/7

'पेज 3', 'सडक' आणि '36 चौरंगी लेन' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि सोनी टीव्ही शोमध्येही काम केले आहे. त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक घटना म्हणजे एका चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता, असा खुलासा खुद्द अभिनेत्रीने सांगितलं होतं. #MeeToo मोहिमेदरम्यान अभिनेत्रीने याचा खुलासा केला होता. 

3/7

महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची भेट 'सारांश' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. महेशचे आधीच लग्न झालं होतं, त्यांना दोन मुलं होते. महेशही सोनीच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेला होता. घरच्यांची तमा न बाळगता त्यांनी सोनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

4/7

महेश भट्ट यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुलं होती. महेशने सोनीशी लग्न केले तेव्हा पूजा आणि राहुलला ते अजिबात आवडले नाही. पूजाने स्वतः एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला तिला वाटले की सोनीने तिच्या वडिलांना तिच्यापासून हिसकावले आहे. यामुळे पूजा सोनीचा तिरस्कार करू लागली.

5/7

मात्र, दुसऱ्याचं घर मोडून स्वत:चं कुटुंब उभं केल्याचा पश्चाताप सोनी राजदानला बराच काळ होता. मात्र पूजा भट्टने तिला समजावून सांगितलं की, असं काही नाही. पूजाने सांगितलं की, तिच्या आई-वडिलांमधील सर्व काही आधीच संपलं होतं, त्यामुळे सोनीने कोणाचेही घर मोजलं नाही.

6/7

1986 मध्ये दूरदर्शन वर येणाऱ्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत सोनी राजदान हिने सुलोचना ही भूमिका साकारली होती . त्याचवेळी तिने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला होता . दरम्यान एका मैत्रिणीच्या फोन कॉलनंतर त्यांच्या महेश आणि सोनी राजदान यांची भेट झाली . आधी मैत्री आणि नंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली .

7/7

सोनी राजदानने 1986 मध्ये महेश भट्ट यांच्याशी लग्न केले. महेश भट्ट यांचे हे दुसरं लग्न आहे. सोनी राजदानसोबत लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. एवढंच नाही तर त्याने आपलं नाव बदलून अश्रफ भट्ट असं ठेवलं. त्याचवेळी सोनी राजदाननेही तिचं नाव बदलून सकीना ठेवलं. दोघांना शाहीन भट्ट आणि आलिया भट्ट या दोन मुली आहेत .