कोणी खड्ड्यात पडतं, तर कोणी घरात बोलवतं आत्मा; सत्य घटनेवर आधारित 'हे' 5 दाक्षिणात्य चित्रपट पाहताना थरकाप उडेल

आजकाल सगळ्यांनाच दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ लागली आहे. त्याचं कारणचं त्यांची पटकथा आहे. त्यांच्या पटकथेतून अनेक वेगळ्या गोष्टी समोर येतात. आज आपण अशाच काही 5 चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. जे सत्य घटनेवर आधारीत आहेत. हे चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच थरकाप होईल. इतकंच नाही तर तुमची झोपही उडू शकते. काही चित्रपट आहेत जे सत्य घटनेवर आधारीत आहेत. तर तुम्हालाही थ्रिल हवं असेल तर नक्कीच हे चित्रपट पाहा. 

| Aug 23, 2024, 17:53 PM IST
1/7

'2018' हा दाक्षिणात्य चित्रपट केरळच्या भयानक गोष्टींवर आधारीत आहे. या चित्रपटाच्या सिनेमेटोग्राफीची सगळीकडे चर्चा होत आहे. जर तुम्हाला त्यावेळी नक्की काय झालं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट नक्कीच पाहा. 

2/7

चित्रपटात त्यावेळीची परिस्थिती स्पष्टपणे दाखवण्यात आली. तुम्ही हा चित्रपट सोनी लिव्हवर पाहू शकतात आणि केरळच्या या दुखद घटनेला एकदी जवळून अनुभवता येईल. 

3/7

'रोमांचम' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला हता. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट सात मित्रांवर आधारीत आहे. छोट्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटानं चित्रपटसृष्टीत धमाल केली होती. 

4/7

चित्रपटातील काही मित्रांनी एक घर भाड्यावर घेऊन ते तिथेच राहत होते. ते मज्जा मस्ती करण्यासाठी ओइजा बोर्डचा वापर करतात. पण त्यानंतर असं काही होतं की सगळ्यांना थरकाप होतं. तुम्ही हा चित्रपट हॉटस्टारवर बघू शकतात. 

5/7

'द हाउस नेक्स्ट डोर' हा एक मजेशीर आणि थ्रिलर असा हॉरर चित्रपट आहे. पण तुम्हाला ही गोष्ट जाणून आश्चर्य होईल की हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर फक्त ट्रेलर आणि टीझर पाहून घाबरता तर विचार करा ज्या व्यक्तीनं हे सगळं अनुभवलं त्याला काय वाटलं असेल. प्राइम व्हिडीओवर हा व्हिडीओ पाहू शकता. 

6/7

'टेक ऑफ' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटातील पटकथा ही इराकच्या तिकरित शहरातील दहशतवादी किडनॅप घेतलेल्या मल्याळम नर्सचा संघर्ष पाहायला मिळत आहे. स्वत: चा जीव वाचवण्यासाठी ती कसे अथक प्रयत्न करते. तिच्यासाठी कसं एक रेस्क्यु ऑपरेशन करण्यात येतं ते पाहायला मिळत आहे. 

7/7

'मंजुम्मेल बॉइज' हा चित्रपट यंदाच्या वर्षीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं बजेट हे 20 कोटी होतं तर या चित्रपटानं 240 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली. हा चित्रपट 11 मित्रांवर आधारीत आहे. त्या मुलांच्या ग्रुपला 'मंजुम्मेल बॉइज' असं म्हणायचे. हे ट्रिपसाठी तमिळनाडूच्या गुना केवला जातात. त्यातील एक मुलगा खोल खड्यात जातो. त्याला कशा प्रकारे वाचवण्यात येतं त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. तर हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.