'...ती आज जिवंत असती तर'

'...ती आज जिवंत असती तर' 

Apr 13, 2018, 16:00 PM IST

'...ती आज जिवंत असती तर' 

1/6

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

नुकतीच 65 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना त्यांच्या 'मॉम' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यानंतर श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी आपला आनंद व्यक्त केला पण यावेळी ते अतिशय भावूक झाले. 'ती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिवंत असती तर...' असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

2/6

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

श्रीदेवी यांचं निधन याच वर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईत झालं होतं. बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून समोर आलं. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी राजकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. 

3/6

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

'मॉम' सिनेमात श्रीदेवी यांनी एका कणखर आईची भूमिका निभावली होती. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीनं एका गुप्तहेराची भूमिका निभावली होती. 

4/6

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

उल्लेखनीय म्हणजे, 'मॉम' हा श्रीदेवी यांचा 300 वा सिनेमा होता. सिनेमात त्या एका सावत्र आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या... या सिनेमाचं कथानक या आई आणि तिच्या मुलीभोवती गुंफलं गेलं होतं. 

5/6

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

या सिनेमातील श्रीदेवी यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. सिनेपरिक्षकांनीही या सिनेमाला चांगले गुण दिले होते. 

6/6

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

Sridevi, 65th National Film Awards, National Awards, Boney Kapoor, Best Actress Award

या सिनेमातून श्रीदेवी यांनी जवळपास पाच वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती. याआधी त्यांचा 'इंग्लिश विंग्लिश' हा सिनेमालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.