PHOTO: मुलीच्या नावाने SIP सुरू करायची की सुकन्या समृद्धीमध्ये पैसे गुंतवायचे? गोंधळला असाल तर जाणून घ्या रिटर्न्स

SSY Vs SIP: मुलींच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक असायला हवी याचा आई वडील नेहमी विचार करत असतात. काहीजण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवतात तर काहीजण एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. पण या दोघांमध्ये कशाला जास्त रिटर्न्स मिळतात? याबद्दल अनेकजण साशंक असतात. याबद्दल जाणून घेऊया.

| Mar 01, 2024, 13:03 PM IST
1/11

मुलीच्या नावाने SIP सुरू करायची की सुकन्या समृद्धीमध्ये पैसे गुंतवायचे? गोंधळला असाल तर जाणून घ्या रिटर्न्स

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

SSY Vs SIP: मुलींच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक असायला हवी याचा आई वडील नेहमी विचार करत असतात. काहीजण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवतात तर काहीजण एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. पण या दोघांमध्ये कशाला जास्त रिटर्न्स मिळतात? याबद्दल अनेकजण साशंक असतात. याबद्दल जाणून घेऊया.

2/11

8.2 टक्के व्याज

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

सुकन्या समृद्धी या योजनेत 8.2 टक्के व्याज मिळते. या योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. ही योजना 21 वर्षात परिपक्व होते आणि या योजनेत, पालकांना मुलीच्या नावे सलग 15 वर्षे पैसे जमा करावे लागतात.

3/11

सुरक्षित आणि हमी परतावा

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

10 वर्षांपर्यंतच्या मुलींचे पालक या योजनेत गुंतवणूक करू शकतात आणि योजनेद्वारे चांगली रक्कम जोडू शकतात.ज्यांना सुरक्षित आणि हमी परतावा असलेल्या योजनेवर विश्वास आहे, अशा पालकांसाठी ही योजना खूप चांगली आहे.

4/11

थोडीशी जोखीम पत्कराल?

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

पण जर तुम्ही थोडीशी जोखीम पत्करू शकत असाल, तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी म्युच्युअल फंडामध्ये SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. हे मार्केट लिंक्ड असल्याने, तुम्हाला त्यात सुरक्षिततेची हमी देता येणार नाही. पण तुम्ही 21 वर्षांत याद्वारे मोठा निधी जमा करू शकता. 

5/11

परतावा जाणून घ्या

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दरमहा रु 5000 जमा केल्याने तुम्हाला किती परतावा मिळेल आणि तुम्ही त्याच रकमेची SIP सुरू केल्यास तुम्हाला काय मिळेल? याबद्दल जाणून घेऊया. यातून मिळणाऱ्या परताव्यातून तुम्हाला अंदाज येईल.

6/11

सुकन्या समृद्धी योजनेतून परतावा

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही दरमहा 5 हजार रुपये गुंतवले तर 15 वर्षांत 9 लाख रुपये गुंतवले जातील. यानंतर पालकांना या योजनेत गुंतवणूक करावी लागणार नाही, परंतु ती रक्कम लॉक करून ठेवली जाईल. 

7/11

27 लाख

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

ही योजना 21 वर्षांनी परिपक्व होईल. यावर 8.2 टक्के व्याज मिळते.  या योजनेत तुम्हाला 18 लाख 71 हजार 031 रुपये व्याज मिळेल आणि 27 लाख 71 हजार 031 रुपये मुदतपूर्तीवर उपलब्ध होतील.

8/11

SIP मधून परतावा

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा रु 5000 गुंतवल्यास, 15 वर्षात तुम्ही येथे 9 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. SIP वर सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. 

9/11

25 लाख

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

तुम्ही 12 टक्क्यांनी हिशोब केला तर 15 वर्षांत तुम्हाला 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख 22 हजार 880 रुपये व्याज मिळेल आणि जर ही रक्कम 15 वर्षांतच काढली तर तुम्हाला 25 लाख 22 हजार 880 रुपये मिळतील. 

10/11

29 लाख

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

जर तुम्ही ही गुंतवणूक आणखी 1 वर्षासाठी चालू ठेवली म्हणजे 15 ऐवजी 16 वर्षे गुंतवणूक केली तर 12 टक्के दराने तुम्हाला 29,06,891 रुपये मिळतील. जे सुकन्या समृद्धी योजनेच्या परताव्यापेक्षा खूप जास्त आहे.

11/11

आता तुम्हीच ठरवा

SSY Vs SIP Start in daughters name or invest in Sukanya Samriddhi know returns

तुम्ही ही गुंतवणूक 21 वर्षे सतत सुरू ठेवल्यास तुम्हाला SIP द्वारे 56 लाख 93 हजार 371 रुपये मिळू शकतात. तर 21 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 12 लाख 60 हजार रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला गुंतवणुकीवर मिळणारे व्याज 44 लाख 33 हजार 371 रुपये असेल.