Tension घेणं सोडा नाही तर एकदिवस कराल पश्चाताप! Stress घेतल्यानं होतील 'हे' गंभीर आजार

स्ट्रेस मॅनेजमेंट हा शब्द बऱ्याचवेळा कॉर्पोरेक्ट सेक्टरमध्ये सहजतेनं ऐकायला यातो. बऱ्याच ठिकाणी तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ट्रेनिंगही देण्यात येते. पण स्ट्रेस मॅनेजमेंटची अशी काय गरज आहे? त्याला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण टेन्शन घेतल्यानं आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. 

Mar 05, 2023, 18:31 PM IST

Stress Management: टेन्शन हा शब्द ऐकला की आपल्याला ही काही मोठी गोष्ट वाटतं नाही. मला खूप टेन्शन आहे असं जर आपल्याला कोणं म्हणालं तर हा असेल ना सांभाळून घे... त्यात काय मला पण टेन्शन आहे असं सहजपणे बोलून जातो. बऱ्याच वेळा समोर काय परिस्थिती आहे हे कोणालाही कळतं नाही. टेन्शन घेतल्यानं आपल्या शरीरावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. तर टेन्शन घेतल्यानं आपल्याला कोण कोणते आजार होतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच Stress Management हे गरजेचं आहे. 

1/6

Stress Management

जर कोणतीही व्यक्ती जास्त टेन्शन घेत असेल तर त्याचा सगळ्यात आधी परिणाम हा त्याच्या मेंदूवर होतो. मेंदूवर परिणाम झाला तर त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदा द्यायचे झाले तर त्या व्यक्तीची एकाग्रता कमी होते, डिप्रेशन, मूड स्विंग्स आणि चिडचिड होणे अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. 

2/6

Stress Management

स्ट्रेस घेतल्यानं त्याचा परिणाम हा हाडं आणि धमन्यांवर होतो. त्यामुळे आपल्याला मसल पेन आणि सूज येऊ शकते. 

3/6

Stress Management

स्ट्रेस घेतल्यानं आतड्यांवरही परिणाम होतो. स्ट्रेसमध्ये असल्यानं पाचन प्रक्रियेवर परिणाम होतो. अपचन, पोटातं दुखनं, जुलाब पर्यंत अनेक समस्या होतात. 

4/6

Stress Management

त्यामुळे टेन्शन घ्यायला नको जर आपण टेन्शन घेतलं तर आपल्या शरिरावर तर परिणाम होतात पण त्यासोबतच आपल्या आरोग्यावरही होतात. टेन्शन घेतल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. 

5/6

Stress Management

स्ट्रेसमुळे कोलेस्ट्रॉल वाढते, ब्लड प्रेशरची तक्रार होते. यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. 

6/6

Stress Management

इतकंच नाही तर टेन्शन घेतल्यानं तुमच्या रिप्रोडक्शन सिस्टिमवर देखील त्याचा परिणाम होतो. यामुळे हार्मोन प्रोडक्शन कमी होतं.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)