Holi 2023 : जळत्या चितेच्या राखेपासून खेळतात होळी; स्मशानातील 'हे' फोटो पाहून येईल अंगावर काटा

Holi Festival 2023 : डमरूचा नाद आणि महादेवाची साथ स्मशानात खेळली जाते अनोखी होळी.  

Mar 05, 2023, 16:57 PM IST

Holi Festival 2023 : महाराष्ट्रासह देशभरात होळी सणाचा उत्साह पहायला मिळत आहे. हिंदू धर्मात होळीच्या सणाला विशेष महत्व आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने होणीचा सण साजरा केला जातो. यापैकी काशी या तीर्थस्थळी साजरी केली जाणारी होळी सर्वात भयानक होळी मानली जाते. येथे स्मशानात चितेच्या राखेपासून होळी खेळली जाते. 

1/8

 या कार्यक्रमात प्रथम बाबा महाशमशन नाथ आणि माता मशन काली यांची मध्यान्ह आरती केली जाते. यानंतर बाबा आणि मातेला चिता आणि गुलाल अर्पण केला जातो. यानंतर चिता भस्म होळी सुरू होते.

2/8

जिथं मृतदेहांचे ढीग आहेत, तिथं प्रियजन गमावल्याच्या दु:खात वावरणारे कुटुंबीयच अंत्यसंस्कार करत आहेत, तिथे ही होळी खेळली गेली.

3/8

शिव-पार्वतीचे रूप घेऊन अवतरलेल्या भोलेनाथाच्या भक्तांनी चितेच्या राखेने होळी साजरी केली. 

4/8

शिवाचे गण यक्ष, गंधर्व, किन्नर, औघड हे सर्व चितेची राख घेऊन होळी खेळण्यासाठी स्मशानभूमीत येतात. यामुळे ही अनोखी होळी पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकही मोठ्या संख्येने गर्दी करतात. 

5/8

या अनोख्या होळीत भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. 

6/8

बाबा विश्वनाथ दरवर्षी होळीच्या दिवशी मणिकर्णिका घाटावर येतात आणि भूत आणि आत्म्यांसह होळी खेळतात.  चितेच्या राखेने होळी खेळण्याची परंपरा 300 वर्षांहून अधिक जुनी असल्याचे समजते. 

7/8

काशीतील स्मशानभूमी असलेल्या हरिश्चंद्र घाटात अंत्यसंस्काराच्या चितेची राख घेऊन होळी खेळण्याची परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे. 

8/8

काशीमध्ये स्मशानात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या होळीला 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी परंपरा आहे.