Survey Data: आठवड्यातील 'या' दिवशी अन् 'इतक्या' वाजता सर्वाधिक लोक ठेवतात शरीरसंबंध; तर नावडता दिवस...

Physical Relation Survey: लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य कोणत्या वेळेला दिलं जातं? किंवा आठवड्यातील कोणत्या दिवशी आणि नेमक्या कोणत्या वेळी सर्वाधिक महिला आणि पुरुष शरीरसंबंध ठेवतात? असा प्रश्न विचारला तर तुम्ही प्रश्न विचारणाऱ्याला वेड्यात काढाला. मात्र नुकत्याच एका सर्वेक्षणात यासंदर्भातील अगदी दिवसच नाही तर दिवसातील कोणत्या वेळी सर्वाधिक लोक संबंध ठेवतात याबद्दलची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जाणून घेऊयात...

| Sep 08, 2024, 16:03 PM IST
1/13

physicalrelation

या सर्वेक्षणामधून फारच रंजक माहिती समोर आली असून केवळ शरीरसंबंध ठेवण्यासाठीचे चांगलेच नाही तर सर्वात नकोसे वाटणारे दिवस कोणते आहेत? कोणत्यावेळी लोकांना अजिबात लैंगिकसंबंध ठेवावेसे वाटत नाहीत याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

2/13

physicalrelation

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर लैंगिक गरजासुद्धा मानवाच्या महत्त्वाच्या गरजांपैकी एक आहेत. लैंगिक संबंधांबद्दल भारतासारख्या देशामध्ये आजही अनेक समज-गैरसमज आहे. आपल्या देशामध्ये लैंगिक समस्यांपासून ते लैंगिकतेबद्दल मोकळेपणे आजही बोललं जात नाही.   

3/13

physicalrelation

असं असतानाच दुसरीकडे परदेशामध्ये लैंगिक संबंध म्हणजेच सेक्स ही फार सर्वसामान्य बाब म्हणून पाहिली जाते. त्यामुळेच तिथे याच लैंगिक संबंधांसंदर्भात वरचेवर वेगवगेळी सर्वेक्षणं होत असतात. नुकतेच असेच एक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामधून लैंगिक संबंध ठेवण्यासाठी लोक कोणत्या वेळेला सर्वाधिक प्राधान्य देतात हे शोधून काढल्याचा दावा करण्यात आला आहे.  

4/13

physicalrelation

जागतिक स्तरावर करण्यात आलेलं हे सर्वेक्षण लक्झरी लिंगरी म्हणजेच महिलांचे अंतवर्स्र तयार करणाऱ्या पोअर मोई (Pour Moi) या कंपनीने केलं आहे.  

5/13

physicalrelation

सर्वेक्षणामध्ये त्यांनी लैंगिकदृष्ट्या सक्रीय असलेल्या सज्ञान लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आपल्या लैंगिक आणि कामुक इच्छासंदर्भात सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी मनमोकळेपणे आपली मतं व्यक्त केली.   

6/13

physicalrelation

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 43 टक्के लोकांनी 'शनिवार हा लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी उत्तम असतो' असं म्हटलं आहे. याच दिवशी आपण लैंगिकसंबंध ठेवतो असं दर 100 पैकी 43 जणांचं म्हणणं आहे.   

7/13

physicalrelation

लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी शनिवारनंतर या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सर्वाधिक पसंती मिळालेला दिवस म्हणजे शुक्रवार! एकूण 22 टक्के लोकांनी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपलं प्राधान्य शुक्रवारला असतं असं म्हटलं आहे.  

8/13

physicalrelation

लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी तिसरा सर्वाधिक पसंतीचा दिवस रविवार असून चौथ्या स्थानावर गुरुवारला पसंती मिळाली आहे. या वारांना अनुक्रमे 10 आणि 6 टक्के अशी पसंती मिळाली आहे.  

9/13

physicalrelation

लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी सर्वात कमी प्राधान्य दिला जाणारा वार म्हणजे सोमवार आहे. या दिवशी लैंगिकसंबंध ठेवण्याची इच्छा केवळ 2 टक्के लोकांनी व्यक्त केली आहे.   

10/13

physicalrelation

लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी दिवसभरातील सर्वाधिक पसंतीची वेळ ही रात्रीच्या तासांपैकी असल्याचं समोर आलं आहे. रात्री 10 वाजून 09 मिनिटं हा सर्वाधिक कामुक वेळ असल्याचं या सर्वेक्षणात समोर आलं आहे.   

11/13

physicalrelation

आठवड्यातील दिवसांमध्ये सांयकाळी लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी कोणीही फारसं उत्सुक दिसलेलं नाही. आठवड्याभरात सर्वात कमी लैंगिक इच्छा असलेला वेळ हा सोमवार दुपारी 1 वाजून 2 मिनिटं असल्याचं या सर्वेक्षणातील लोकांनी म्हटलं आहे.  

12/13

physicalrelation

48 टक्के लोकांनी आठवड्यातून एकदाच लैंगिकसंबंध ठेवतो असं सांगितलं. तर 19 टक्के लोकांनी आठवड्यातून दोन वेळा लैंगिकसंबंध ठेवतो असं म्हटलंय. तर 13 टक्के लोकांनी आठवड्यातून तीन वेळा आणि 7 टक्के लोकांनी आठवड्यात चारदा लैंगिकसंबंध ठेवतो असं म्हटलं आहे. केवळ 1 टक्के लोकांनी आपण दररोज लैंगिकसंबंध ठेवतो असं म्हटलं आहे.

13/13

physicalrelation

या सर्वेक्षणामध्ये नियमितपणे लैंगिकसंबंध ठेवणारे 2000 लोक सहभागी झाले होते, असं सर्वेक्षण घेणाऱ्या पोअर मोई (Pour Moi) या कंपनीने सांगितलं आहे.