PHOTO: 'सुख कळले' ते 'रमा -राघव' छोट्या पडद्यावरील 'सावित्रींनी' अशी केली वटपौर्णिमा साजरी

Marathi TV Actress Vat Purnima Celebration: वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास  नवऱ्याची आयु वाढते, असे मानले जाते. कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना उत्तम गुणवत्ता असलेल्या मालिका भेट देत असून नेहमीच रसिकांचे मनोरंजन करत आली आहे.  

| Jun 21, 2024, 16:25 PM IST
1/7

कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना उत्तम गुणवत्ता असलेल्या मालिका भेट देत असून नेहमीच रसिकांचे मनोरंजन करत आली आहे.    

2/7

नेहमीच रसिकांसाठी काहीतरी हटके घेऊन येत असते. हीच परंपरा आपल्या लाडक्या कलर्स मराठीनं देखील जोपासली असून नुकताच कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर वटपौर्णिमाचा खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. 

3/7

'इंद्रायणी' या मालिकेमधून शकुंतला वडाच्या झाडाला कुंकू लावतेय. वटपौर्णिमेच्या शुभदिनी शकुंतला पूजेसाठी इंदूला घेऊन जाते. आनंदी या समारंभात इंदूच्या उपस्थितीवर आक्षेप  घेते. परंतु झाडाजवळ साप दिसल्यावर इंदू धैर्याने अधूला जवळ घेत त्याचे सापापासून रक्षण करते. 

4/7

'अबीर गुलाल' मालिकेतील श्रीची आई वडाच्या झाडामागून येताना दिसत आहे.

5/7

'रमा -राघव' मालिकेतून रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ सात जन्म राहू देत असे म्हणत आहे. 

6/7

'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेतून सावी अर्जुनची साथ मागत आहे. या मालिकेत आपल्याला दिसतंय की , एकीकडे सावी अर्जुनसाठी  वटपौर्णिमेची पूजा करत असून बाच्याला सावीबद्दल भावना निर्माण होत आहेत.

7/7

'सुख कळले' या मालिकेतून मिथिला तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत आहे. तर माधव मिथिलाला वचन देतो की, वटपौर्णिमेपर्यंत तो बँकेच्या फसवणुकीमागील खरा गुन्हेगार कोण आहे, हे शोधून काढणार आहे.