Summer Drinks : उन्हाळ्यात कोल्ड्रींक ऐवजी प्या या फळांची थंडगार स्मूदी

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याबरोबरच ऊर्जा देणाऱ्या फळांपासून नैसर्गिक पद्धतीने तयार तकणाऱ्या ज्यूसचं  सेवन केल्यास शरीराला पोषक तत्वं मिळतात. उन्हळ्यामध्ये  शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी फळांच्या ज्यूसचे होणारे फायदे जाणून घेऊयात. 

Mar 10, 2024, 14:48 PM IST

कडाक्याच्या उन्हामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. ऊन्हाळ्यात पाहुणे घरी आल्यावर शरीराला थंडावा मिळण्याकरीता बरेच जण कोल्ड्रींकचं सेवन करतात. त्यामुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. म्हणूनच कोल्ड्रिंकऐवजी फळांचा ज्यूस प्यायल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही.

1/7

मिक्स फ्रूट ओट्स स्मूदी

असं म्हणातात की, त्या त्या ऋतूमध्ये येणारी फळं खाणं शरीराला फायदेशीर ठरतं. त्यामुळे सिझननुसार मार्केटमध्ये उपलब्ध असलेली फळं, दूध आणि ओट्स एकत्र करून तयार केलेली स्मूदी शरीराला फायदेशीर ठरते.   

2/7

मँगो बनाना स्मूदी

उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला ताकद देण्याकरीता आंबा, केळी, बदाम आणि दूध  एकत्र करून मँगो बनाना स्मूदी बनवली जाते. ही स्मूदी लहान मुलांच्या वाढीसाठी आरोग्यवर्धक आहे. 

3/7

वॉटरमेलन स्मूदी

कलिंगडमध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते, त्यामुळे गर्मीच्या दिवसात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याकरीता कलिंगड फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला सतत कलिंगड खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही कलिंगड, दूध किंवा नारळाचं पाणी एकत्र करून त्याची स्मूदी तयार करू शकता. 

4/7

चॉकलेट बनाना स्मूदी

लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयातील व्यक्ती चॉकलेट खाणं पसंत करते. जर तुमच्य़ा घरातील लहान मुलं फळं खाण्यास नकार देत असतील तर बदाम पावडर, केळी, दूध आणि चॉकलेट एकत्र करून तयार केलेली स्मूदी  लहान मुलांना देऊ शकता.   

5/7

मिंट स्मूदी

पुदीना हा शरीरात थंडावा निर्माण करतो. गरमीच्या दिवसात तेलकट,चमचमीत आणि मसाल्याचे पदार्थ खाल्यास छातीत जळजळ होणं किंवा पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर  मिक्स फळं,दूध आणि पुदीन्याची पानं एकत्र करून मिंट स्मूदी तयार करा. या  मिंट स्मूदीमुळे जळजळ आणि अपचनाचा त्रास कमी होतो.   

6/7

बेरीज स्मूदी

स्टॉबेरी खाण्याला बरेच जण पसंती देतात. सकाळी उठल्यावर जर तुम्ही स्ट्रॉबेरी, ब्लेकबेरी आणि ब्लूबेरी दूधात मिक्स करून केलेल्या ज्यूसचं सेवन केलं तर उन्हाळ्यात होणाऱ्या सन टॅनची समस्या दूर होते. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी बेरीज स्मूदी फायदेशीर ठरते. 

7/7

पाइन अ‍ॅप्पल स्मूदी

कडाक्याच्या उन्हामुळे अनेकांना लघवीला त्रास होणं यासारखे आजार होतात. अननसामध्ये 'व्हिटामीन सी' ची मात्रा मुबलक प्रमाणात असते. त्याशिवाय अननसात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अननसाचे काप दुधात टाकून केलेल्या ज्यूसमुळे शरीरातील दाह कमी करण्यात मदत होते.