Summer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी

Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...

Mar 23, 2024, 10:17 AM IST
1/7

उन्हात बाहेर जाताना गॉगल, रुमाल किंवा टोपी वापरा.

2/7

फिकट रंगाचे, सैल आणि सुती कपडे घाला. 

3/7

पचायला हलका, कमी आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावे.  

4/7

टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी अशा फळांचे सेवन करा. 

5/7

नारळ पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस  घ्यावा, जेवनानंतर ताक ही घ्यावे. 

6/7

घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा ठेवा. 

7/7

उन्हाळ्यात बचाव करण्यासाठी ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा 'हायड्रेट' करण्यास मदत होते.