नर्सच्या 'त्या' एका चुकीमुळे कोळ्यांच्या घरात पोहोचले असते सुनील गावसकर; क्रिकेटला अलविदा करुन अनेक वर्षांनंतरही आहेत धनवान

Sunil Gavaskar Net Worth :  भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सुनील गावस्कर कसोटीमध्ये 10,000 धावा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे जगातील पहिले फलंदाज आहेत. पण जन्माच्या वेळी नर्सच्या त्या चुकीमुळे ते कोळ्यांच्या घरात पोहोचले असते आणि ते क्रिकेट नाही तर...

| Jul 10, 2024, 08:14 AM IST
1/10

क्रिकेट जगतातील लिटिल मास्टर अशी ओळख असणारे आपले सुनील गावस्कर यांच्या आज 75 वा वाढदिवस आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक विक्रम केले. 

2/10

गावसकर यांच्या मैदानातील खेळी चाहत्यांना आजही लक्षात आहे. तसंच त्यांचा वैयक्तित आयुष्यातही अनेक किस्से आहेत. ज्या ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हॉस्पिटलमधील त्या घटनेनंतर त्यांचं आयुष्य काही वेगळंच असतं. 

3/10

हॉस्पिटलमध्ये नर्सच्या चुकीमुळे आज गावसकरांचं नाव क्रिकेट विश्वास चमकलं नसतं. हा किस्सा सनी डेज या आत्मचरित्रात सांगण्यात आलंय. 

4/10

गावसकर यांच्या जन्म झाला तेव्हा त्यांचे अंकल पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी गावसकर यांच्या कानावरही काळा डाग म्हणजे जन्मचिन्ह पाहिलं होतं. 

5/10

ते जेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी बाळाला मांडीवर घेतलं तर काय त्या बाळाच्या कानावर काळा गाड नव्हता. त्यानंतर संपूर्ण रुग्णालयात मुलांची तपासणी झाली. तेव्हा गावसकर हे मच्छिमाराच्या पत्नीजवळ आरामात झोपले होते. 

6/10

हॉस्पिलटमधील नर्सच्या चुकीमुळे ते त्या महिलेकडे पोहोचले होते. मुलांना आंघोळ घातलाना कदाचित ही अदला बदली झाली होती. 

7/10

आज सुनील गावसकर क्रिकेट विश्वाला अलविदा करुन कॉमेंट्री करतात. पण त्यासोबत ते एक व्यवसायिक आहे. त्यांनी सुमेध शाह यांच्यासोबत 1985 मध्ये त्यांनी भारतातील पहिली स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी स्थापन केलीय. ते या कंपनीचे संचालक आहे. 

8/10

ते समालोचनाव्यतिरिक्त पॅनेलिस्ट म्हणूनही काम करतात. त्यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 220 कोटींपेक्षा अधिक आहे. 

9/10

गावसकर यांना दर्जेदार आलिशान गाड्यांचा शौक आहे. त्याच्या गॅरेजमध्ये 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची MG हेक्टर प्लस, 1.2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची BMW 7 सीरीज, 70 लाख रुपयांची BMW 5 सीरीज पाहिला मिळते. 

10/10

तर सुनील गावसकर मुंबईत तर कधी गोव्यात आलिशान घरात राहतात. इसप्रवा व्हिला असं त्यांच्या गोव्यातील बंगल्याच नाव आहे. तर एक चांगले क्रिकेट, समालोचकासोबत उत्तम समाजसेवकही आहेत.  अनेक समाजसेवा संस्थांसोबत त्यांचा संबंध आहे.